थोडक्यात (About Acer Nitro V16 )
- गॅमेर्स साठी Acer चा Acer Nitro V 16 हा खतरनाक लॅपटॉप भारतात झाला आहे लाँच.
- Ace चा हा भारतात लाँच पहिला AI gaming laptop आहे.
- Acer Nitro V16 ची भारतीय किंमत Rs 1,09,999 इतकी आहे.
Acer Nitro V 16 Gamming Laptop Launch: प्रसिद्ध लॅपटॉप आणि स्मार्टफोन उत्पादक कंपनी Acer ने भारतात त्याचा पहिला पूर्णपणे AI-सक्षम गेमिंग लॅपटॉप, Acer Nitro V 16, लॉन्च केला आहे. हा गेमिंग लॅपटॉप AMD Ryzen 7 8845HS प्रोसेसर, NVIDIA GeForce RTX 4060 GPU, 16GB DDR5 RAM आणि 1TB SSD ने सुसज्ज आहे, सर्व Windows 11 मधील Copilot फिचरसोबत तयार केलेला आहे .चला तर मग आज या लेख च्या माध्यमातून जाची याची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल सर्व माहिती बघूया.
Acer Nitro V 16 Specifications
Category | Specification |
---|---|
Display | 16-inch LCD |
Processor | AMD Ryzen 7 8845HS, Peak performance output of 3.8GHz |
Graphics | NVIDIA RTX 4060 GPU, 8GB GDDR6 VRAM, 85W TGP |
RAM | 16GB LPDDR5 RAM |
Storage | 1TB M.2 NVMe SSD |
Operating System | Windows 11 pre-installed |
Battery | 59Wh battery, up to 7 hours of battery life |
Charging | 135W charging adapter |
Connectivity | Wi-Fi 6E, 1 x Thunderbolt 4 port, 1 x USB 3.2 Gen 1 Type-A port, 1 x USB 3.2 Gen 2 Type-A port, 1 x HDMI output port, 1 x RJ45 Ethernet jack |
- Acer Nitro V 16 Display
- Nitro V 16 मध्ये 16-इंचाचा LCD डिस्प्ले दिलेला आहे, ज्याचे WQXGA रिझोल्यूशन आहे. तसेच 16:10 आस्पेक्ट रेशो दिलेला आहे ज्यामुळे अधिक कार्यक्षम आणि विस्तृत दृश्य अनुभवता येतात, जे विशेषतः मल्टी-टास्किंग आणि गेमिंगसाठी चांगले आहे. 165Hz रिफ्रेश रेट गेमिंगमध्ये चांगले आणि प्रतिसादक्षम दृश्य अनुभव प्रदान करतो,अश्या या डिस्प्ले मुळे हा लॅपटॉप गेमर्स साठी खूपच चांगला ठरतो.
- Acer Nitro V 16 Processor And Graphics
Nitro V 16 मध्ये AMD Ryzen 7 8845HS प्रोसेसर आहे, जो 3.8GHz पर्यंतच्या पीक कार्यक्षमता साधतो. या प्रोसेसरमुळेजास्त कार्यक्षमता आणि जलद प्रोसेसिंग क्षमता मिळते, जे गेमिंग आणि इतर कामांसाठी आवश्यक आहे. या प्रोसेसरसह यामध्ये NVIDIA RTX 4060 GPU आहे, ज्यामध्ये 8GB GDDR6 VRAM आणि 85W TGP (Total Graphics Power) आहे. या ग्राफिक्स कार्डामुळे उच्च-गुणवत्तेच्या गेम्स आणि ग्राफिक्स-आधारित अॅप्लिकेशन्ससाठी उत्कृष्ट ग्राफिकल प्रदर्शना साठी चांगले आहे.
- Acer Nitro V 16 OS:
Aser चा हा लॅपटॉप Windows 11 सह प्री-इंस्टॉल्ड येतो, जी नवीनतम ऑपरेटिंग सिस्टिम आहे आणि यामध्ये उपडेटेड युजर इंटरफेस, अद्ययावत सुरक्षा फीचर्स आहे. - Acer Nitro V16 RAM And Storage
Nitro V 16 मध्ये 16GB LPDDR5 RAM आहे, जी उच्च गती आणि मल्टीटास्किंग क्षमतेसाठी उपयुक्त आहे. यासोबत, 1TB M.2 NVMe SSD स्टोरेज उपलब्ध आहे, ज्यामुळे फास्ट डेटा ऍक्सेस आणि लोडिंग वेळ कमी होतो. जास्त स्टोरेजमुळे गेम्स, फाइल्स, आणि सॉफ्टवेअर सुरक्षितपणे स्टोअर करता येतात.
- Acer Nitro V 16 Battery
Aser Nitro V 16 लॅपटॉप मध्ये 59Wh बॅटरी आहे, जी 7 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ प्रदान करते, त्यामुळे जास्त वेळेसाठी गेमिंग आणि काम करणे शक्य होते. तसेच यामध्ये 135W चार्जिंग अडॅप्टर दिलेले आहे जे बॅटरीला जलद चार्जिंग करते,ज्यामुळे कमी वेळात बॅटरी पूर्ण चार्जे केली जाऊ शकते. - Acer Nitro V 16 Conectivity:
या लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6E सपोर्ट आहे, ज्यामुळे जास्त गतीचे वायरलेस इंटरनेट कनेक्शन मिळते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये एक Thunderbolt 4 पोर्ट, एक USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट, एक USB 3.2 Gen 2 Type-A पोर्ट, एक HDMI आउटपुट पोर्ट आणि एक RJ45 Ethernet जॅक यांचा समावेश आहे. हे विविध गोष्टींना आणि बाह्य डिस्प्ले कनेक्ट करण्यास उपयोगी आहे.
- Acer Nitro V16 Other features
लॅपटॉपमध्ये Kensington लॉक आहे,जे फिजिकल सुरक्षा देते, तसेच यामध्ये आणि MSFT Pluton सुरक्षा प्रोसेसर दिलेले आहे, जो डेटा सुरक्षा आणि धोके टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा देतो.
Acer Nitro V 16 Price And Availability
Acer Nitro V 16, हा लॅपटॉप AI-सक्षम गेमिंग लॅपटॉप आहे,जो भारतात ₹1,09,999 किंमतीत उपलब्ध आहे. हा लॅपटॉप Acer च्या विशेष स्टोर्स आणि Flipkart वर खरेदी साठी उपलब्ध आहे. तसेच अत्याधुनिक AMD Ryzen 7 8845HS प्रोसेसर, NVIDIA GeForce RTX 4060 GPU, 16GB DDR5 RAM आणि 1TB SSD सह सुसज्ज असलेल्या या लॅपटॉपने गेमिंग प्रेमींच्या एक चांगला पर्याय असणार आहे.
FAQ
Aser च्य या लॅपटॉपमध्ये RAM किती आहे?
लॅपटॉपमध्ये 16GB LPDDR5 RAM आहे.
Acer Nitro V 16 ची भारतीय किंमत किती आहे?
Acer Nitro V 16 ची भारतातील किंमत ही ₹1,09,999 इतकी आहे.