बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर बेंगळूर येथील मॅजेस्टिक बसस्थानकानजीक रस्त्याच्या बाजूने चालत जाताना बसखाली सापडून चापगाव (ता. खानापूर) येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव भूषण भावकाण्णा पाटील (वय 30, रा. चापगाव) असे आहे.
युवक कामानिमित्त बेंगळूरला गेला होता
याबाबत बेंगळूर येथील मॅजेस्टिक पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी, भूषण पाटील हा रस्त्याच्या बाजूने चालत जाताना त्याचा तोल जाऊन पडला. त्याचवेळी तेथून तामिळनाडू परिवहन मंडळाची बसत्याच्या जागीच ठार झाला. सदर युवक कामानिमित्त बेंगळूरला गेला होता. बेंगळूर येथील मॅजेस्टिक पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
Accident near Majestic bus stand in Bangalore Khanapur Youth Dies Belgaum
Accident near Majestic bus stand in Bangalore Khanapur Youth Dies Belgaum