दुर्मिळ ध्रुवीय अस्वलाला पोलिसांनी गोळी घालून केले ठार; Iceland मधील घटना

Pratiksha Majgaonkar
5 Min Read
Iceland

तब्बल ८ वर्षांनी ध्रुवीय पांढरे अस्वल Iceland मध्ये दिसले होते. आर्क्टिक महासागर, त्याच्या सभोवतालचे समुद्र आणि जमिनीच्या भागात, विशेषतः आर्क्टिक सर्कलमध्ये हे पांढरे अस्वल आढळते परंतु तब्बल ८ वर्षानंतर दिसलेल्या या दुर्मिळ ध्रुवीय अस्वलाला Iceland मधील पोलिसांनी गोळी घालून ठार केले आहे.

बऱ्याच दिवसापासून या अस्वलामुळे Iceland मधील स्थानिक लोकांना धोका निर्माण झाला होता या कारणामुळे या अस्वलाला गोळ्या घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अस्वला विषयी पर्यावरण संस्थेशी सल्लामसलत करण्यात आली होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्राणी स्थलांतरित करण्याच्या ते विरोधात होते आणि म्हणूनच नाईलाजाने पर्यावरण संस्थेच्या परवानगीनेच हे पाऊल उचलण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी या अस्वलाला गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

आता ते अस्वल शास्त्रज्ञांच्या ताब्यात देण्याची योजना आखली गेली आहे. या अस्वलाच्या शरीरातील चरबीची टक्केवारी, अवयवांचे आरोग्य आणि अस्वलाची संपूर्ण तपासणी करण्याची योजना आहे. तसेच भविष्यकालीन संग्रहासाठी या अस्वलाची कवटी जतन करून ठेवण्यात येणार आहे.

या घटनेनंतर Iceland पोलिसांचे वक्तव्य

एपीने वेस्टफोर्ड पोलिस प्रमुख हेल्गी जेन्सन यांनी असे सांगितले की, “ आम्हाला हे करायचे नव्हते. आम्हाला हे अजिबात आवडत नाही.” पुढे त्यांनी त्यांच्या अश्या निर्णयामागे जे कारण होते ते सांगितले. ते म्हणाले; “हे अस्वल एका ग्रीष्मकालीन घराच्या अगदी जवळ होते, जिथे एक वृद्ध स्त्री राहत होती. त्या वेळी अस्वल तिच्या कचऱ्यात काहीतरी शोधत असल्याने घाबरून एकट्या महिलेने वरच्या मजल्यावर कोंडून घेतले. भीतीपोटी वृद्ध महिलेने रेकजाविकमधील तिच्या मुलीशी सॅटेलाइट लिंकद्वारे संपर्क साधला.”

- Advertisement -

अस्वलामुळे महिलेच्या जीवाला धोका

तेथील इतर रहिवाश्यांनी आधीच ते क्षेत्र सोडले होते आणि या महिलेलाही आपल्याला धोका होऊ शकतो याची जाणीव आणि माहिती होती या बद्दल स्पष्टीकरण देताना पोलिस प्रमुख हेल्गी जेन्सन पुढे म्हणाले; “असे असतांनाही ती महिला तिथेच राहिली.”

अण्णा स्वेन्सडॉटिर जे आइसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे वैज्ञानिक संग्रहाचे संचालक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार, पांढरे अस्वल हे मूळ Iceland चे नसतात तर बर्फाच्या तुकड्यांवरून काहीवेळा ते ग्रीनलँड मधून Iceland च्या किनारी भागात येतात. गेल्या काही आठवड्यात आइसलँड किनाऱ्यावर बरेच असे बर्फाचे तुकडे दिसले आहेत.

८ वर्षानंतर प्रथमच Iceland मध्ये दिसले अस्वल

२०१६ नंतर आइसलँड मध्ये हे १९ सप्टेंबर रोजी ठार झालेले अस्वल प्रथमच दिसले आहे. या अस्वलाचे वजन १५० ते २०० किलो दरम्यान असल्याचे अवहालात म्हणले आहे. आइसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये ते पुढील अभ्यासासाठी नेण्यात येणार आहे.

या अस्वलाला ध्रुवीय अस्वल म्हणूनही ओळखले जाते. एपी अहवालात म्हणल्याप्रमाणे ही देशातील संरक्षित प्रजाती असली तरी जर यामुळे मानवाला किंवा प्राण्यांना धोका निर्माण होत असेल तर अधिकारी प्राणघातक कारवाई करू शकतात आणि यालाच अनुसरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पांढरे अस्वल सापडण्याची ठिकाणे

ही जी ध्रुवीय अस्वले आहेत ती आर्क्टिक महासागर, त्याच्या सभोवतालचे समुद्र आणि जमिनीच्या भागात विशेषतः आर्क्टिक सर्कलमध्ये राहतात. ही अस्वले या भागाची मूळ रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

कोडियाक अस्वलाप्रमाणे ध्रुवीय अस्वलाला पृथ्वीवरील सर्वात मोठे अस्वल म्हटले जाते. या प्रकारची अस्वले जगातील सर्वात मोठी मांसाहारी प्राणी असल्याचे सांगितले जाते.

ध्रुवीय अस्वलांचे मानवा वरील हल्ले

मानवांवर ध्रुवीय अस्वलांचे हल्ले दुर्मिळ असले तरी, वाइल्डलाइफ सोसायटी बुलेटिनने प्रकाशित केलेल्या 2017 च्या अभ्यासात मानवावरील हल्ल्यांचा वाढता धोका लक्षात घेतला आहे कारण हवामानातील बदलामुळे समुद्रातील बर्फ कमी होतो आणि अन्नाच्या शोधात अधिक अस्वलांना जमिनीवर ढकलले जाते.

कॅनडा, ग्रीनलँड, नॉर्वे, रशिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये 1870 ते 2014 दरम्यान वन्य ध्रुवीय अस्वलांचे 73 हल्ले या अभ्यासात नोंदवले गेले, परिणामी 20 मृत्यू आणि 63 जखमी झाले.

ध्रुवीय अस्वलाबद्दल काही तथ्य

  1. अंटार्क्टिका भागात आढळणारी ही अस्वले पांढऱ्या रंगाची असतात.
  2. खरेतर या अस्वलाच्या त्वचेचा रंग काळा असतो परंतु त्याच्या अंगावरील केस पांढऱ्या रंगाचे असतात त्यामुळे ही अस्वले पांढरी भासतात.
  3. पाणी झटकून टाकणारी केसाळ त्वचा आणि शरीरावरील चरबीचा जाड थर त्यांचे थंडीपासून रक्षण होते.
  4. ही अस्वले पोहण्यात पारंगत असतात.
  5. त्यांचा ताशी वेग सहा मैल इतका असतो आणि आपल्या मागच्या पंजाचा उपयोग ते पुढे जाण्यासाठी करतात.
  6. या अस्वलांचा आहार म्हणजे समुद्रातील मासे आणि सिल.
  7. ही अस्वले दोन पायांवर उभी राहू शकतात आणि बसू शकतात.
  8. जेव्हा त्यांना धोका जाणवतो तेव्हा ती आपल्या दोन्ही पायांवर उभी राहून वास घेऊन धोका ओळखतात.
  9. ते आपले खाद्य शोधण्यासाठी वासावर अवलंबून असतात कारण त्यांची दृष्टी कमकुवत असते.

Our Web Stories


Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *