Xiaomi ने 29 जुलै रोजी भारतात दोन नवीन टॅब्लेट्स लाँच केले आहेत. Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G हे दोन टॅब्लेट्स लाँच केलेले आहे. Redmi Pad Pro 5G हा चायनामध्ये उपलब्ध असलेला आहे तसाच टॅबलेट आहे, तर Redmi Pad SE हा भारतात एप्रिलमध्ये लाँच झालेल्या Redmi Pad SE चा 4G वेरिएंट आहे. हे दोन्ही टॅब्लेट्स वेगवेगळ्या किंमत श्रेणीत आणि वापरकर्त्यांच्या गरजांसाठी योग्य आहेत. जाणून घेऊया भारतीय बाजारात, Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G दोन्ही या टॅब्लेट्स च्या किंमती, उपलब्धता, आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल.
Redmi Pad Pro 5G Specification
डिस्प्ले: या टॅबलेट मध्ये12.1 इंचाचा 2.5K डिस्प्ले दिलेला आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 600 निट्स पिक ब्राइटनेस आहे. तसेच ह्या डिस्प्लेमध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट आलेला आहे, व यामध्ये Dolby Vision, आणि Corning Gorilla Glass 3 सुरक्षा आहे.
Highlights
- प्रोसेसर : या टॅब्लेटमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आणि Adreno 710 GPU वापरले आहे.जे कि एका अँड्रॉइड साठी खूप चांगले मानले जाते.
- RAM आणि स्टोरेज : या टॅबलेट मध्ये 8GB RAM आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज दिलेले आहे.तसेच यामध्ये microSD कार्डद्वारे स्टोरेज 1.5TB पर्यंत वाढवता येते.
- कॅमेरा : या टॅब्लेटमध्ये 8MP चा कॅमेरा फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूस दिलेला आहे.
- बॅटरी : बॅटरी बद्दल तर या मध्ये 10,000mAh बॅटरी असून,ती 33W फास्ट चार्जिंगला समर्थन करते.
- सॉफ्टवेअर : या टॅबलेट मध्ये Xiaomi HyperOS सॉफ्टवेअर दिलेले आहे जे Android 14 वर आधारित आहे.
त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 3.5mm हेडफोन जॅक, क्वाड स्पीकर्स, आणि Dolby Atmos सुद्धा उपलब्ध आहे.
हे हि वाचा –
- HMD Crest Series- 25 जुलै ला भारतात झाली आहे लाँच! या तारखे पासून येणार खरेदी करता.
- iPhone 16 Pro and iPhone 16 Pro Max launching : सप्टेंबर महिन्यात होणार आहे आयफोन 16 सिरीज लाँच! बघा अपेक्शित फीचर्स.
Redmi Pad SE 4G Specification
डिस्प्ले : या टॅबलेट मध्ये 8.7 इंचाचा मोठा डिस्प्ले दिलेला आहे आणि हा हा एक आरामदायक दृश्य प्रदान करतो, ज्यामुळे विडिओ पाहणे आणि गेम खेळणे अधिक आनंददायी होतो.तसेच यामध्ये HD LCD तंत्रज्ञान वापरले आहे ज्यांनी रंगीत चित्रे खूप भारी दिसते,तसेच उत्कृष्ट दृश्य अनुभव सुनिश्चित करते. त्याच बरोबर यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन स्मूथ आणि लवकर प्रतिसाद देतात.
प्रोसेसर : हा टॅबलेट MediaTek Helio G99 चिपसेट सहायेतो ज्यांनी गेमिंगसाठी उत्तम परफॉर्मन्स मिळतो, तसेच हा मल्टीटास्किंग सुलभ बनवतो. या टॅबलेट मध्ये 4GB RAM केवळ अॅप्स आणि कार्ये चालवण्यासाठीच नाही, तर अधिक वेगवान अॅप स्विचिंगसाठी देखील सक्षम आहे.तसेच यामध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्याला मोठ्या प्रमाणावर डेटा, फाइल्स आणि अॅप्स साठवण्याची सुविधा देते.तसेच microSD कार्ड स्लॉट द्वारे यातील स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते, ज्यामुळे अतिरिक्त जागा मिळवता येते.
कॅमेरा : या टॅब्लेटमध्ये 8MP चंग मागच्या बाजूला कॅमेरा दिलेला आहे. ज्यामध्ये उच्च गुणवत्तेच्या चित्रांसह विविध फोटोग्राफ काढता येतात. तसेच या स्मार्टफोन मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे जो स्पष्ट आणि गुणवत्तापूर्ण व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फीजसाठी उपयुक्त आहे.
बॅटरी : या टॅबलेट मध्ये 6,650mAh बॅटरी दीर्घकालीन वापरासाठी आणि जास्त काळ टिकण्यासाठी उपयुक्त आहे.तसेच यामध्ये 18W फास्ट चार्जिंगसह, बॅटरी लवकर चार्ज होते, त्यामुळे कमी वेळात हा टॅब चार्ज होतो.
सॉफ्टवेअर : हा टॅबलेट Android 14 वर चालणार आहे, त्यामुळे हा सुरक्षा अपडेट्स आणि सुधारित अनुभव प्रदान करतो.
कनेक्टिव्हिटी आणि अतिरिक्त वैशिष्ट्ये : या टॅबलेट मध्ये 3.5mm हेडफोन जॅक रेगुलर हेडफोन्स कनेक्ट करण्याची सुविधा आहे.तसेच यामध्ये Bluetooth 5.4 स्थिर आणि जलद वायरलेस कनेक्शनसाठी सक्षम आहे.त्यासोबतच USB Type-C पोर्ट डेटा ट्रान्सफर आणि जलद चार्जिंगसाठी उपयुक्त आहे. व डुअल स्टेरियो स्पीकर्स उत्कृष्ट ऑडिओ ऐकण्यासाठी दिलेला आहे.
Redmi Pad Pro 5G And Redmi Pad SE 4G Price In India
Redmi Pad Pro 5G
Redmi Pad Pro 5G दोन प्रकारात उपलब्ध आहे.
1) Wi-Fi वेरिएंट:
RAM आणि स्टोरेज: 6GB RAM आणि 128GB स्टोरेज
किंमत: ₹21,999
2) Wi-Fi + सेलुलर वेरिएंट:
8GB RAM आणि 128GB स्टोरेज: ₹24,999
8GB RAM आणि 256GB स्टोरेज: ₹26,999
रंग : Graphite Grey आणि Quick Silver
Redmi Pad SE 4G
वेरिएंट्स:
4GB RAM आणि 64GB स्टोरेज: ₹10,999
4GB RAM आणि 128GB स्टोरेज: ₹11,999
रंग : Forest Green, Ocean Blue, आणि Urban Grey
FAQ:
1)Redmi Pad Pro 5G आणि Pad SE 4G कोणत्या रंगात उपलब्ध आहेत?
Redmi Pad Pro 5G मध्ये Wi-Fi वेरिएंट मध्ये Graphite Grey, Mist Blue हे तर Wi-Fi + सेलुलर वेरिएंट मध्ये Graphite Grey, Quick Silver कलर आहेत. तर Redmi Pad SE 4G मध्ये Forest Green, Ocean Blue, Urban Grey हे कलर आहेत.
2) Redmi Pad Pro 5G मध्ये कॅमेरा कसा आहे?
Redmi Pad Pro 5G मध्ये पाठीमागच्या बाजूला 8MP आणि पुढच्या बाजूला 8MP कॅमेरा दिलेला आहे, जो उच्च गुणवत्ता आणि स्पष्ट फोटोज काढण्यासाठी भारी आहे.
1 thought on “Redmi Pad Pro 5G आणि Redmi Pad SE 4G भारतात झाले आहे लाँच! बघा याची किंमत व सर्व यामधील सर्व धमाकेदार फीचर्स.”