बी.एस.एन.एल. ची आता डायरेक्ट टक्कर जिओशी BSNL VS JIO

Admin
5 Min Read
sakaltime.com

दिनांक ३ जुलै २०२४ पासून टेलीकोम कंपनी रिलायंस जिओ (Reliance jio ) ने आपल्या सर्व प्लानमध्ये जवळ जवळ २२% ते २३% पर्यंत वाढ केली आहे. हि वाढ कमी नाही ग्राहकांच्या खिशाला महिन्याला जवळ जवळ ३६ रुपये प्रत्येकी कात्री बसणार आहे. जिओ (Jio) पाठोपाठ टेलीकोम क्षेत्रातील मोठी कंपनी एअरटेल (Airtel) ने हि आपल्या सर्व प्लान मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे एका घरामध्ये सरासरी ५ सीम कार्ड असले तरी रु. १७५ ते रु. २०० परिवाराची महिन्याच्या खर्चात वाढ झाली आहे. या प्लान च्या वाढीमुळे आता सर्वजन बी.एस.एन.एल. (Bsnl) कडे वळत आहेत. सध्या सर्वात कमी किमतीचे प्लान फक्त बी.एस.एन.एल. (Bsnl) चेच आहेत त्यामुळे सर्वजन बी.एस.एन.एल. चा आधार घेत आहेत. काही जणांनी तर आपले जिओ किंवा एअरटेल चे सीम बी.एस.एन.एल. मध्ये पोर्ट हि केले आहे.

किती वाढले जिओ (Jio Plans) चे प्लान

रिलायंस जिओ (Jio) कंपनीने आपल्या टेलीकोम क्षेत्रात खूप मोठे पाउल उचलले आहे. सर्व प्लान जवळ जवळ २२% नि महाग केले आहेत, जिओ च्या पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान चा हि समावेश आहे. सर्वात कमी रु.चा प्रीपेड महिन्याचा प्लान २ जीबी दररोज डेटा सहित रु. १५५ चा होता तो आता कंपनीने रु. १८९ चा केला आहे. तसेच कंपनी 5G देता जो अमर्यादित देत होती ते आता बंद केले आहे. आता  फक्त मोठ्या रिचार्ज वरच जिओ ग्राहकांना 5G अमर्यादित डेटा मिळणार आहे. ८४ दिवसांचा जो फेमस प्लान होता तो आता कंपनीने ८५९ रुपयांना केला आहे.

मुलाचे लग्न केले तो खर्च ग्राहकांकडून वसूल

सोशियल मेडिया वर जिओ (Jio) ला असेही ट्रोल केले जात आहे कि, मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात भरपूर पैसा खर्च केला. तो पैसा वसूल करण्यासाठी जिओ चे प्लान २३% वाढविले आहेत. लग्नाचे सर्व पैसे ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत असेही सोशियल मेदियावर फटकेबाजी करण्यात येत आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani)  आणि विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका Radhika Merchant) यांचे प्री वेडिंग, लग्न आणि नंतर रीसेप्शन झाले. या लग्नासाठी मुकेश अंबानी यांचे शहर जामनगर महिनाभर सजवले होते, सर्वांना जेवण आणि लग्नामध्ये बॉलीवूड अभिनेत्री, अभिनेते तसेच प्रसिद्ध सिंगर्स, डान्सर्स, क्रिकेटर्स सोबत बर्याच देशाचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान हि या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाच्या पूर्ण कार्यक्रमाला असा अंदाज लावण्यात येतो कि ५००० करोड रुपये खर्च आला.

बी.एस.एन.एल. चे प्लान (Bsnl All Plans)

असे बोलले जाते कि, जिओ, व्ही.आय. आणि एअरटेल यांनी या महिन्यात आपले प्रीपेड आणि पोस्टपेड चे प्लान २०% ते २५% वाढवल्यावर आत्ता लोकांना बी.एस.एन.ची. आठवण झाली आहे. कारण आजही बी.एस.एन.एल. चे प्लान (Bsnl Best Plans) जिओ, व्ही.आय. आणि एअरटेल पेक्षा जवळ जवळ ४०% ते ५०% स्वस्त आहेत. जसे कि बी.एस.एन.एल. ची 5G सुविधा अजून पर्यंत चालू झालेली नाही आणि  त्यांचे 4G अजून स्टेबल नाही. परंतु प्लान ५०% स्वस्त असल्यामुळे सर्व जन आता बी.एस.एन.एल. कडे वळत आहेत.

- Advertisement -
ALL Network Plans Compare

बी.एस.एन.एल (Bsnl) आणि टाटा (TATA) यांच्यामध्ये करार

टाटा कंपनी कुणाला माहित नाही असे नाही. टाटा ने ज्या क्षेत्रात पाउल टाकले तिथे यशस्वी झाले आहेत. मोबईल वापरकर्त्यांसाठी हि खूप मोठी बातमी आहे की, बी.एस.एन.एल आणि टाटा यांच्यामध्ये सुमारे १५ हजार कोटींचा करार झाला आहे. TATA CONSULANCY SERVICE सोबत हा करार झाला आहे. करारानुसार टाटा कंपनी गावोगावी बी.एस.एन.एल. चे जाळे अजून मजबूत करण्यासाठी १००० खेड्यांमध्ये 4G टोवर उभारणीचे काम करणार आहे. तसेच टाटा ने काम घेतले म्हटल्यावर बी.एस.एन.एल. नक्कीच सक्सेस गाठेल. यामुळे जीओ आणि एअरटेल यांची हवा टाईट होणार आहे. कारण आताच BSNL सीम ची विक्री आत्ताच तिप्पट वाढली आहे आणी BSNL पोर्ट करणाऱ्यांची संख्या अडीच पतीने वाढली आहे.

BSNL ग्राहकांना आत्ताच का आठवले

जसे की ३ जुलै पासून जीओने (Jio) आपल्या सर्व प्लान मध्ये २५% वाढ केली आहे. त्याच पाठोपाठ एअरटेल आणि व्हिआय ने हि त्यांचे प्लान जीओ एवढेच म्हणजेच २५% वाढवले आहेत. सध्या जीओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) कंपनीचे 5G वापरणारे ग्राहक संख्या जास्त आहे. परंतु प्लान वाढल्यामुळे आता सर्वजन BSNL मध्ये शिफ्ट व्हायला लागले आहेत. BSNL चे प्लान सर्वात स्वस्त आहेत परंतु त्यांचे नेटवर्क चा प्रोब्लेम आणि सर्विस चांगली नसल्याने ते कुणी वापरत नव्हते परंतु आता टाटा शी करार झाल्यामुळे BSNL ला अच्छे दिन आणे वाले है. सध्या सोशियाल मेडिया वरपण #Bsnl_ki_ghar_Wapsi हा ट्रेंड हि खूप व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे जीओ ग्राहकांनी #Boycottjio हा ट्रेंड चालू केला आहे.  

https://www.youtube.com/watch?v=lFRYrQGhtJ8
Share This Article
3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *