अभिनेत्री दिपाली भोसले ते दिपाली सय्यद प्रवास आणि एकूण संपत्ती किती  ( Dipali Sayed) ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“जत्रा” या मराठी चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेल्या दिपाली सैद आहेत तरी कोण आणि दिपाली भोसले च्या दिपाली सय्यद (Dipali Sayed) कश्या झाल्या आणि त्यांची एकूण संपत्ती (Net Worth) किती ? हे सर्व आज आपण या ब्लोग मध्ये जाणून घेणार आहोत. त्यांना लहान पनापासून  जत्रा या मराठी चित्रपटात नृत्य आणि अभिनयाची आवड त्यांची अभिनय क्षेत्रात करियर ची सुरुवात लवकरच केली परंतु २००५ साली आलेला  मराठी चित्रपट (Marathi cinema) जत्रा यामधील ‘ये गो ये, ये मैना, या गाण्यापासून त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली.

दिपाली सय्यद ( Dipali Sayed) कोण ?

यांचे नाव दिपाली भोसले, यांचा जन्म बिहारमध्ये दिनांक १ एप्रिल १९७८ साली झाला. दिपाली यांनी त्यांचे शिक्षण बिहार मधीलच सी.व्ही.आर. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून पूर्ण केले तसेच नालंदा विद्यापीठ मधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. . त्यांनी अभिनयाची सुरुवात मालिकांमधून केली, जसेकी अफलातून, बंदिनी, दुर्वा, अप्सरा आली. परंतु मालिकांमधून त्यांना यश मिळाले नाही. त्या एक उत्कृष्ट नृत्यांगना असल्यामुळे खूप रियालिटी शो मध्ये त्या परीक्षक म्हणून दिसतात. २००८ मध्ये दिपाली भोसले यांनी दिर्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केले आणि दिपाली भोसले चे दिपाली सय्यद झाले.

दिपाली सय्यद  ( Dipali Sayed) यांचे गाजलेले चित्रपट

दिपाली सय्यद ( Dipali Sayed) यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत जेमतेम २२ ते २५ चित्रपटच केले. लग्नानंतर दिपाली यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. साधारण २००६ ते २०१६ असा फक्त दहा वर्षाच्या काळात त्यांनी हे २५ चित्रपट केले. त्यातील ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘जत्रा’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘ मुंबईच डबेवाला’, ‘माझ्या नवर्याची बायको’ हे चित्रपट खूप गाजले. काही असे चित्रपट होते जे प्रेक्षांना अजिबात आवडले नाहीत, जसे कि ‘करायला गेलो एक’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘ लाडीगोडी’, ‘ पैसा पैसा’.

हे हि वाचा -  मराठी पाऊल पड़ते पुढे- छाया कदम (Chhaya Kadam) चा मराठी लुक चा परदेशात बोलबाला

दिपाली सय्यद यांचा राजकीय प्रवास

दिपाली सय्यद या राजकारणात आपले नशीब आजमावायला आल्या परंतु  त्यांच्या हाती कायम पराभवच आला. त्यानी  बरेच वेळा निवडणूक लढवली परंतु सगळ्या ठिकाणी त्यांचा पराभवच झाला. चित्रपट कारकीर्दीतून बाहेर पडल्यावर त्या राजकारणात सक्रीय झाल्या. त्यांनी सर्वात प्रथम २०१४ साली आम आदमी (Aap) पक्षात प्रवेश केला आणि अहमदनगर मधून निवडणूक लढवली परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. मधल्या काळात त्यांनी शिवसंग्राम या पक्षात हि प्रवेश केला होता. अखेर त्यांनी २०१९ मध्ये शिवसेने (Shivsena) मध्ये प्रवेश केला. ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे श्री. जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेले कळवा – मुंब्रा या मतदार संघातून दिपाली यांनी उमेदवारी अर्ज भरला.

कळवा – मुंब्रा या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (RCP) पक्षाचे श्री. जितेंद्र आव्हाड यांची हाट्रिक मोडण्यासाठी दिपाली यांना रातोरात निवडणुकीत उभे करण्यात आले होते. असे बोलले जाते कि एक दिवस अगोदर अर्ज भरून कुणी निवडून येते का आणि त्यांच्यावर अशीही टीका झाली कि सोफिया जहांगीर सय्यद या नावाने प्रचार केलें, त्यांनी सोयीनुसार धर्माचा वापर केला. या हि ठिकाणी दिपाली सय्यद यांचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर त्या राजकारणातून बाहेर पडल्या कोणतीही निवडनुक लढवली नाही. 

दिपाली सय्यद यांची संपत्ती (Dipali Sayed Net Worth)

त्यांनी ज्यावेळेस २०१९ मध्ये कळवा – मुंब्रा या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळेस त्यांनी आपली संपत्ती नमूद केली होती. त्याप्रमाणे त्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख आणि पतीचे वार्षिक उत्पन्न ११ लाख ५१ हजार एवढे होते, त्याचप्रमाणे त्यांनी एल.आय.सी. मध्ये ५७ लाखांची गुंतवणूक केलेली हि दाखवली आहे. दिपाली भोसले उर्फ दिपाली सय्यद यांच्या नावावर फोर्चूनर (Fortuner Car) आणि होंडा एकोर्ड गाडी आहे. तसेच दिपाली यांनी स्वतः कडे ४० तोळे सोने (Gold) दागिने रुपात आणि पतीकडे २० तोळे सोने असल्याचेही नमूद केले आहे. दिपाली सय्यद यांचे अंधेरी मध्ये एक स्वतः चा प्लट  आहे. त्याची किंमत सध्या सुमारे दोन कोटी (2Cr) पेक्षा जास्त आहे, तसेच याशिवाय पतीच्या नावावर पश्चिम अंधेरीमध्ये एक प्लट आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारी अर्जात नमूद केल्या प्रमाणे त्यांची एकूण संपत्ती चार कोटींहून अधिक आहे. 

हे हि वाचा -  “महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणता ही चेहरा उभा करा आम्ही पाठींबा देवू”, Uddhav Thackeray

सोशिअल मेडियावर भरपूर फोलोअर्स 

दिपाली सय्यद यांनी आताच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. परंतु निवडणूक पुन्हा लढविणार कि नाही हे अजून जाहीर केलेले नाही. परंतु त्या राजकीय कार्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. तसेच दिपाली या सोशियल मिडीया द्वारे कायम संपर्कात असतात. दिपाली सय्यद यांच्या इंस्ताग्राम (Instagram) प्रोफाईल ला सात लाख पेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. तसेच त्यांचे फेसबुक (facebook) वरही ३२५००० पेक्षा जास्त फोलोअर्स आहेत.  

2 thoughts on “अभिनेत्री दिपाली भोसले ते दिपाली सय्यद प्रवास आणि एकूण संपत्ती किती  ( Dipali Sayed) ?”

Leave a Reply