राज्य सरकारने सुरू केलेल्या Chief Minister’s Tirtha Darshan Scheme अंतर्गत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थस्थळांना मोफत भेट देण्याची संधी मिळते. या योजनेत महाराष्ट्रातील ६६ आणि देशभरातील ७३ तीर्थस्थळांचा समावेश आहे. मुंबई आणि ठाणे येथील ४०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दर्शनाचा लाभ मिळाला आहे. यात्रेसाठी जिल्हानिहाय कोटा ठरवला जातो, आणि अधिक अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाते.
also read – डॉलर च्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण – dollar to rupees
✅ अर्ज कसा कराल?
Chief Minister’s Tirtha Darshan Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन पोर्टलवर किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रात अर्ज भरावा लागतो. अर्ज विनामूल्य असून, अर्जदाराने प्रत्यक्ष उपस्थित राहून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अर्ज मंजूर झाल्यास संबंधित व्यक्तीला एकदा तीर्थयात्रेची संधी दिली जाते. ७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना जोडीदार किंवा सहाय्यकासोबत प्रवास करण्याची परवानगी दिली जाते.
🚌 मोफत प्रवास आणि सुविधा!
मुंबई व ठाणे येथून अयोध्येसाठी प्रत्येकी ४०० ज्येष्ठ नागरिक प्रवासाला गेले होते. एका प्रवासासाठी ८०० प्रवाशांची आवश्यकता असल्याने नियोजनानुसार यात्रा आयोजित केली जाते. यामध्ये रेल्वे किंवा बस प्रवासाची मोफत सोय दिली जाते, तसेच निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी असून, धार्मिक पर्यटनाचा आनंद मोफत मिळवण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक नागरिकांनी लवकर अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा! 🚆🙏