कांदा घोटाळ्याचा भांडाफोड: Nashik Onion Scam 

Admin
5 Min Read
Onion Scam

Onion Scam News: नाशिक विभागातील कांदा खरेदीसंदर्भातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शेतकरी, ग्राहक आणि सरकार तिघांचीही फसवणूक करणाऱ्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनसीसीएफशी (National Cooperative Consumers’ Federation) संबंधित १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, त्यांच्यासोबतचे सर्व व्यवहार तत्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Onion Scam चे मूळ आणि कारवाईची कारणे 

एनसीसीएफ आणि नाफेड या सरकारी संस्थांमार्फत कांदा खरेदी केली जाते, जेणेकरून कांद्याच्या किमती स्थिर राहाव्यात आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा. मात्र, या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.  

Onion Scam चा प्रकार असा होता: 

  • काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सरकारकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीसाठी पैसे घेतले, पण प्रत्यक्षात कांदा साठवून ठेवला नाही. 
  • काही कंपन्यांनी केवळ २५% ते ५०% कांदा खरेदी करून नाफेडला दिला, आणि उरलेला कांदा खुल्या बाजारात अधिक किमतीत विकून मोठा नफा कमावला. 
  • कांद्याचे दर वाढल्यावर साठवलेला कांदा उच्च दराने विकण्यात आला आणि नाफेडला परतावा दिलाच नाही.  – काही कंपन्यांनी नाफेडसाठी निश्चित रब्बी कांद्याऐवजी कमी टिकणारा आणि स्वस्त दराचा खरीप कांदा परतावा म्हणून दिला

also read – आता सातबारा उताऱ्यामध्ये होणार हे ११ महत्वाचे बदल, 7/12 utara update

गुन्हेगारी स्वरूपाचा गैरव्यवहार उघडकीस 

माध्यमे आणि काही शेतकरी संघटनांनी या घोटाळ्याची माहिती बाहेर काढल्यानंतर ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. यानंतर, नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांनी या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई केली.  

- Advertisement -

विशेष म्हणजे, नाफेडने पुण्यातील एका एफपीओवर गुन्हा दाखल केला आहे, कारण त्यांनी केवळ कागदोपत्री कांदा पुरवला आणि प्रत्यक्षात कांद्याचा साठा नव्हता. 

Onion Scam मध्ये सामील असलेल्या कंपन्या 

केंद्र सरकारने खालील १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे: 

  1. गौतमी गोदावरी फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  2. पान्झाराक्कन फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  3. जनाई डेअरी शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  4. गोदावरी फार्म्स असोसिएट प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  5. महा एफपीओ फेडरेशन 
  6. गंगा मध्यमेश्वर फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  7. गुरुसिद्धी फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  8. दि लोकराजे शाहू महाराज मल्टीस्टेट अॅग्रो को ऑप. सोसायटी लिमिटेड 
  9. स्वप्नशिवार अॅग्री फार्म प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  10. श्री स्वामिनी फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  11. कणलाड अॅर्गो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  12. अग्निवेश अॅर्गो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  13. सेवेन क्रिस्टल अॅग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  14. मल्मथ शेतकरी विकास प्रोडूसर कंपनी लिमिटेड 
  15. जय अॅग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड 

केंद्र सरकारची तातडीची कारवाई 

Onion Scam ची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतला. एनसीसीएफचे महासंचालक अनीस जोसेफ चंद्रा यांनी या कंपन्यांसोबतचे सर्व व्यवहार तातडीने थांबवण्याचा आदेश दिला. तसेच, नाफेडलाही कठोर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

याव्यतिरिक्त, ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. या वेळी संबंधित कंपन्यांना १५ दिवसांत कांद्याचा परतावा करण्याचा आदेश देण्यात आला. जर हा परतावा वेळेत दिला नाही, तर संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

also read – Mini Tractor– शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक फायदा देणारा पर्याय

राजकीय फटका आणि घोटाळेबाजांचे हाल 

Onion Scam  मुळे सत्ताधारी भाजपला मोठा राजकीय फटका बसला आहे. यामुळे सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागला. काही कंपन्यांचे संचालक सध्या दिल्लीत तळ ठोकून आपल्या कारवाईला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर काही जण सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांची मदत घेण्यासाठी धडपड करत आहेत. 

नाफेडच्या व्यवस्थापकाला निलंबनाचा दणका 

या प्रकरणात नाफेडच्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे समोर आले आहे. नाफेडच्या नाशिक येथील व्यवस्थापकाने या भ्रष्ट कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे अदा केले होते, जरी त्यांनी कांदा खरेदी केला नव्हता. यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. 

घोटाळेबाज कंपन्यांची नवीन क्लृप्ती! 

कारवाईचा धसका घेत काही कंपन्यांनी आता खुल्या बाजारातून स्वस्त कांदा खरेदी करून नाफेडला परतावा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी परतावा म्हणून रब्बी कांद्याऐवजी नाशवंत आणि दर्जाहीन कांदा दिला. हा प्रकार पुन्हा समोर आल्याने सरकारने आणखी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सरकारचा स्पष्ट इशारा – फसवणूक करणाऱ्यांना माफी नाही! 

या घोटाळ्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही भ्रष्ट शेतकरी उत्पादक कंपनीला माफ केले जाणार नाही आणि अशा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 

निष्कर्ष 

Onion Scam हा फक्त आर्थिकच नाही, तर शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही विश्वासाला तडा देणारा आहे. सरकारी संस्थांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यात अशा भ्रष्ट कंपन्यांना शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे शोषण करणे शक्य होणार नाही. 

केंद्र सरकारच्या या कारवाईमुळे घोटाळेबाज कंपन्यांचे धाबे दणाणले असून, येत्या काळात आणखी काही कंपन्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *