बेळगाव : 3 अधिकारी निलंबित… 508 एकर जमिनीचे कागदपत्र…

Belgaum Belgavkar
2 Min Read

@हुळंद 508 एकर 20 गुंठे जमीन सार्वजनिक वापरासाठी राखीव

बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : जांबोटी महसूल केंद्राच्या व्याप्तीमधील हुळंद (ता. खानापूर) गावच्या रि. स. नं. 3 मधील 508 एकर 20 गुंठे जमीन सार्वजनिक वापरासाठी राखीव असल्याचे माहीत असूनही बेकायदेशीर कागदपत्रे तयार करुन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी येथील भूमापन विभागाच्या प्रभारी अधीक्षकासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हुळंदमधील 508 एकर 20 गुंठे जमीन संपूर्ण गावच्या मालकीची आहे

प्रभारी अधीक्षक ए. सी. किरणकुमार, भूमापक आर. सी. पत्तार आणि भूमापक एम. आय. मुतगी अशी त्यांची नावे आहेत. भूमापन, महसूल व भूमि अभिलेख विभागाचे आयुक्त जे. मंजुनाथ यांनी कर्नाटक शासकीय सेवा नियमावलीनुसार या तिघांच्या निलंबनाचे आदेश बजावले आहेत.

जमिनीच्या 11 इ प्रकरणासाठी अर्ज दाखल केला. यावेळी

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हुळंदमधील 508 एकर 20 गुंठे जमीन संपूर्ण गावच्या मालकीची आहे. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने या जमिनीच्या 11 इ प्रकरणासाठी अर्ज दाखल केला. यावेळी सदर जमीन सार्वजनिक मालमत्ता असताना भूमापन विभागातील कर्मचार्‍यांनी हे आपसात वाटणीचे प्रकरण असल्याचे दाखवून 9 क्रमांकाच्या रकान्यातील गावचा हक्क कमी केला. गावाशी संबंध नसलेल्या तिघांची नावे जमिनीच्या उतार्‍यात दाखल करण्यात आली. ही माहिती निदर्शनास येताच ग्रामस्थांनी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे धाव घेऊन चौकशीची मागणी केली होती.

ग्रामस्थांची ही तक्रार आणि वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातमीचा आधार घेत बेकायदेशीर व नियमबाह्य फेरफारप्रकरणी तीन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

Belgaum Khanapur 3 officers suspended Huland village land

Belgaum Khanapur 3 officers suspended Huland village land

Belgaum Khanapur 3 officers suspended Huland village land

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *