कर्नाटक : धक्कादायक… वाढदिवस साजरा केला अन् काही तासांतच विद्यार्थ्याचा मृत्यू

Belgaum Belgavkar
2 Min Read

IIM-Bangalore student found dead on campus day after birthday celebration

IIM-Bangalore student from Surat found dead near hostel

कर्नाटक—belgavkar : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन कोसळल्याने एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. 5 जानेवारी रोजी बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वसतीगृहात ही घटना घडली. निलय कैलाशभाई पटेल असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा गुजरातचा असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे. रिपोर्टनुसार, 5 जानेवारी रोजी नियलचा वाढदिवस होता. त्याने रात्री 12 वाजता मित्राच्या खोलीत केक कापून वाढदिवस साजरा केला, त्यानंतर मध्यरात्री तो त्याच्या खोलीत जायला निघाला. मात्र, खाली येत असतानाच दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून तो खाली कोसळला. दरम्यान, सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना वसतिगृहाच्या इमारतीसमोर त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

 

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल, असेही ते म्हणाले. या घटनेनंतर आयआयएममध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. निलय पटेल हा अतिशय हुशार होता, अशी प्रतिक्रिया काही शिक्षकांनी दिली आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण संस्थेवर शोककळा पसरली असल्याचे त्यांनी सांगितलं.

 

The death of a student of the Indian Institute of Management, Bengaluru (IIM-B), Nilay Kailashbhai Patel, who had presumably fallen off the second floor of his hostel, has sparked an online debate on caste-based discrimination.

IIM-Bangalore student found dead
IIM-Bangalore student found dead

IIM-Bangalore student found dead

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *