Atishi breaks down over BJP leader Ramesh Bidhuris remarks : ‘Never thought politics could stoop so low’
He can’t even walk without help : Delhi CM Atishi in tears over Ramesh Bidhuri’s remark on her father
Delhi Assembly Election 2025 Updates : भाजपचे नेते व दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश बिधूडी यांच्या विधानांवरून सध्या राजकारण तापले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या व मुख्यमंत्री आतिशी यांच्या वडिलांविषयी तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. या
विषयावर बोलताना आतिशी यांना सोमवारी मीडियासमोरच रडू कोसळले.
दिल्लीत पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी प्रचार मात्र शिगेला पोहचला आहे. भाजपने बिधूडी यांना कालकाजी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. याच मतदारसंघातून आतिशी आपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावर टीका करताना बिधूडी यांची जीभ घसरली होती.
भाजप नेते बिधूडी यांच्या विधानानंतर आतिशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, माझे वडील आयुष्यभर शिक्षक होते. त्यांनी दिल्लीतील हजारो मुलांना शिकवले. आज ते 80 वर्षांचे आहेत. आधाराशिवाय ते चालू शकत नाहीत, एवढे ते आजारी आहेत. तुम्ही निवडणुकीसाठी एका ज्येष्ठ व्यक्तीला शिव्या देण्याइतपर्यंत खालच्या स्तराला जाल. ते दहा वर्षे खासदार होते, कामाच्या जोरावर मते मागावीत, असे सल्ला आतिशी यांनी दिला.
आतिशी यांनी रडत-रडतच याविषयी भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘बिधूडी यांनी दहा वर्षे काय काम केले, हे कालकाजीतील नागरिकांना सांगावे. ते माझ्या वडिलांना शिव्या देत मते मागत आहेत. हे खूपच वाईट आहे.’ दरम्यान, बिधूडी यांनी रविवारी रोहिणी येथे आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये आतिशी आणि प्रियांका गांधींवर टीका केली होती.
आतिशी यांच्यावर टीका करताना बिधूडी म्हणाले होते की, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपला बाप बदलला आहे. त्या मार्लेनाच्या सिंह झाल्या आहेत. नाव बदलले. केजरीवालांनी मुलांची शपथ घेत भ्रष्टाचार करणार नाही, असे म्हटले होते. मार्लेनांनी तर नावच बदलले. हे त्यांचे चरित्र आहे.
BJP leader Ramesh Bidhuris remarks
BJP leader Ramesh Bidhuris remarks
BJP leader Ramesh Bidhuris remarks