Theft in Shivabasaveshwar Swamiji Temple in Tigadi
बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव व बैंलहौगल-सौंदत्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बैलहोंगल तालुक्यातील तिगडी येथील हिरेमठाचे श्री शिवबसप्पा अज्जनवर मठात (गदगी अज्ज मठ) शनिवारी रात्री चोरट्यांनी 15 लाखाहून अधिक किमतीचे सुमारे तीस किलोहून अधिक चांदीचे दागिनेव इतर वस्तू लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास मंदिरा शेजारी सुतार बंधूच्या महिला झाडेलोट करत असताना मंदिराला लावलेला कुलूप तोडलेल्या अवस्थेत पडल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिराला लागूनच आजूबाजूला मठात पूजा करण्याऱ्यांची घरे तसेच मठासमोर कुंभार वसाहत व शेतकऱ्यांची घरे असतानादेखील येथे घडलेल्या या चोरीमुळे गावात खळबळ उडाली आहे.
शनिवारी रात्री कुंभार वसाहतसमोर असलेल्या समोरील मठातील बंद असलेल्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांनी पुढील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर शिवबसप्पा अज्जनवर मठात मूर्तीवर घातलेला चांदीचा मुखवटा, चांदीचा हार, चांदीची गणेशमूर्ती, चांदीचा नंदीसह अनेक ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार मठाचे स्वामींनी बैलहोंगल पोलीस ठाण्यात दिली आहे.
शनिवारी रात्री या मठात पूजाविधी आटोपून मंदिराला कुलूप लावून घरी गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास मठाची पूजा करायला स्वामी जात असताना मंदिरालगत कुलूप तोडलेल्या अवस्थेत नजरेस पडले, तसेच मठाचा दरवाजाही उघडा असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित गल्लीतील ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर जमलेले ग्रामस्थ हिरेमठात जाऊन पाहणी केली असता मठातील मूर्तीला घातलेले सर्व चांदीचे दागिने, मूर्ती, इतर साहित्य चोरीला गेल्याचे समजताच ग्रामस्थांनी तात्काळ बैलहोंगल पोलीस ठाण्याला माहिती दिली.
बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नायक सीपीआय पंचाक्षरी साालीमठ व पोलीस तातडीने येऊन पाहणी करून पंचनामा केला. गावात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज घेण्यात आली असून लवकरच चोरट्यांना गजाआड करणार असल्याची बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नायक यांनी दिली आहे. या भागात चोरीच्या घटना वाढल्या असून या घटनेने गावातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Shivabasaveshwar Swamiji Temple in Tigadi
Shivabasaveshwar Swamiji Temple in Tigadi