विवाहित स्त्रिया पळून जाण्याच्या घटना वाढल्या….
बेळगाव—belgavkar—belgaum : कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने विवाहित महिला पळून जाण्याचे व घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह सहन न झाल्याने काही महिला अथवा पुरुष आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाचा अतिवापर व गतिमान जीवनशैलीमुळे पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष, पती-पत्नीमध्ये गैरसमज – निर्माण होणारा संशय, सुसंवादाचा अभाव व व्यसनाधीनता या कारणांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.
त्यातून घटस्फोट, पळून जाणे, आत्महत्या यांसारखे प्रकार घडू लागले आहेत. ते टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवणे व त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. तसेच नातेसंबंधात संशय निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. प्रेमात ठार वेडे असलेली लोक कधी काय करतील सांगू शकत नाही. अलीकडेच नात्यांची व्याख्या बदलत चालली आहे. अनैतिक संबंधातून घडलेले गुन्हे किंवा विवाहबाह्य संबंधात झालेली वाढ हे चिंतेचे कारण आहे.
बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावात एक विवाहित महिला आपल्या 2 मुलांना घेऊन त्याच्याच एका मित्रासोबत भूररररररर….. झाल्याची घटना घडली आहे. खानापूर गावातील आसिफ सय्यद नावाचा व्यक्ती ड्रायव्हर असून बेळगावात राहत होता. पत्नी मसाबी ही दोन मुलांसह घरातील सामान घेऊन पळून गेल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
पती आसिफने कमावलेली संपत्ती पत्नीला हस्तांतरित केली होती. घरातील मालमत्तेची कागदपत्रे, सोन्याचे दागिने आणि सिलिंडरसह मित्र बसवराज सोबत घरातून बाहेर पडल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ आणि मसाबी यांचे 2017 मध्ये लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्याशिवाय आरोपी बसवराज हा त्याच्याकडे काम करत होता. आसिफने त्याचा मित्र बसवराज याच्यावर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आसिफची परिस्थिती अशी आहे की, त्याने जमवलेली संपत्ती बायकोच्या ताब्यात दिली होती आणि ती त्याच्यासोबत आता भूररररररररर….. झाली आहे.
married woman in Marihal village of Belgaum
married woman in Marihal village of Belgaum
married woman in Marihal village of Belgaum