Broken Knife Found in Pizza
Man finds piece of knife in pizza ordered from Domino’s, outlet apologises
Pizza Horror in Pune : Broken Knife Piece Found in Familys Meal
- आवडीचा पदार्थ करेल तुमचा घात…
- पिझ्झा खाताय तर सावधान… कारण…
- पिझ्झा खाल्लात तर तुमच्या जिभेचाच तुकडा…
अर्ध्या तासात मिळणारा, वुड फायर ओव्हन मधला किंवा मग चौकातल्या पिझ्झावाल्याकडे मिळणारा पिझ्झा जर तुम्ही चविचवीनं खातं असाल तर इकडे लक्ष द्या… पुण्यात घडलेल्या प्रकारानं पिझ्झा लव्हर्समध्ये खळबळ माजलीये… पिझ्झा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ… मात्र आता जर तुम्ही पिझ्झा खात असाल तर लगेच सावध व्हा.
कारण पुण्याजवळच्या इंद्रायणीनगरमध्ये एका पिझ्झामध्ये चक्क चाकूचा तुटलेला तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे पिझ्झा लव्हर्सला मोठा धक्का बसलाय. नेमका काय प्रकार घडला…? पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे.
इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी काल रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमीनोज पिझ्झा स्टोअर मधून 596 रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना, अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच्या तुटलेला तुकडा घुसला होता. अरुण कापसे यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच डोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.
मात्र, सुरुवातीला त्यांना डोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली. मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झा कडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी, खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे हे पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत.
पिझ्झा खाताना काळजी घ्या :
– बाहेरुन ऑर्डर मागवल्यानंतर ती नीट तपासून घ्या
– माहित असलेल्या ठिकाणावरूनच अन्नपदार्थ ऑर्डर करा
– रेस्टॉरंट संदर्भातील रिव्ह्यूज वाचायला विसरु नका
– ऑफर्सच्या नादात तुमची फसवणूक होत नाही ना हे तपासा
– शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा
त्यामुळे तुम्हीही बाहेर कुठे पिझ्झा खात असाल तर त्या पिझ्झा मध्ये आपल्याला इजा होईल अशी वस्तू तर नाही ना? याची खात्री नक्कीच करा आणि मगच पिझ्झाचा आनंद लुटा….!
Broken Knife Found in Pizza
Broken Knife Found in Pizza