बेळगाव : अनगोळ संभाजी महाराज मूर्ती अनावरण – काय म्हणाले जिल्हाधिकारी

Belgaum Belgavkar
3 Min Read

भाजपाचे सायंकाळी 5 वाजता ‘चलो अनगोळ’, पोलिस बंदोबस्त वाढवला

बेळगाव—belgavkar—belgaum : मुख्य चौकात प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण योग्यवेळी भव्य सोहळ्यानिशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांनी शनिवारी जाहीर केले.

 

अनावरण सोहळा लांबणीवर टाकावा

अधिकार्‍यांनी शनिवारी स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे रविवारी प्रशासनाकडून होणारा अनावरण सोहळा लांबणीवर पडला आहे. अनगोळच्या मुख्य चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरणावरून वाद निर्माण झाला आहे. महापौर, उपमहापौरांनी चौथर्‍यासाठी वास्तू पूजन केले असून रविवारी मूर्ती अनावरण होणार असल्याचे जाहीर केले. पण, मूर्तीचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे अनावरण सोहळा लांबणीवर टाकावा, अशी मागणी करत अनगोळमधील काही पंच आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला.

- Advertisement -

मूर्तीचे अनावरण भव्य सोहळ्याने करण्यात येणार

हा वाद जिल्हाधिकार्‍यांपर्यंत पोहोचल्यानंतर शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी अनगोळ येथे मूर्ती कामाची पाहणी केली. पंच, कार्यकर्ते आणि लोकांशी अर्धा तास चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे उभारण्यात आलेल्या या मूर्तीचे अनावरण भव्य सोहळ्याने करण्यात येणार आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत. शिष्टाचाराचे उल्लंघन होणार नाही आणि कार्यक्रम सर्वसमावेशक होण्यासाठी आम्ही तयारी करणार आहोत. त्यामुळे रविवारी कोणीही मूर्ती स्थळाकडे येऊ नये. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

 

बेळगाव हे शांतताप्रिय शहर आहे. त्यामुळे आम्ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेऊ. रविवारी नियोजित कार्यक्रमाला सरकारची परवानगी नाही. त्यामुळे सर्वांनी शांततेत घरात राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. रविवारी कार्यक्रम करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांशीही आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणीवेळी जिल्हाधिकारी रोशन, पोलिस आयुक्त मार्बन्यांग आणि महापालिका आयुक्त शुभा बी., म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर, उमेश कुर्‍याळकर, बी. ओ. येतोजी, माजी नगरसेवक राकेश पलंगे आदी उपस्थित होते.

 

शनिवारी सकाळी आमदार अभय पाटील यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी चर्चा केल्यानंतर महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी पुन्हा मूर्ती कामाची पाहणी करून रविवारी अनावरण सोहळा होणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तथा महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. तर शिवप्रतिष्ठानच्या वतीने रविवारच्या कार्यक्रमाला संभाजी भिडे गुरुजी येणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले.

 

शनिवारी जिल्हाधिकार्‍यांची बैठक : माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी लोकांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर अनावरण कार्यक्रम भव्यतेने करण्यात येणार असल्याचे कळवले आहे. शिवाय रविवारी अनगोळ गावभागाची बैठक घेणार असल्याचेही जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले आहे.

Angol Sambhaji Maharaj idol unveiled Belgaum collector
Angol Sambhaji Maharaj idol unveiled Belgaum collector
Angol Sambhaji Maharaj idol unveiled Belgaum collector

Angol Sambhaji Maharaj idol unveiled Belgaum collector

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *