बेळगाव—belgavkar—belgaum : चिकुडमध्ये (ता. अथणी) दहा दिवसांपूर्वी गर्भवतीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. हा खून मृत महिलेच्या धाकट्या बहिणीच्या पतीने केल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अप्पय्या हिरेमठ (वय 36, रा. तेरदाळ) असे संशयिताचे नाव आहे.
महिला घरी एकटी असताना हल्लेखोराने
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, 21 डिसेंबर रोजी सुवर्णा महांतय्या मठपती (वय 36, रा. चिकुड, ता. अथणी) या गर्भवती महिलेचा तिच्या राहत्या घरी खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. सदर महिला घरी एकटी असताना हल्लेखोराने धारदार शस्त्राने तिच्या डोकीत, गळ्यावर व शरीरावर वार करुन खून केला होता.
यानंतर हल्लेखोर पळून गेल्याने तो नेमका कोण, हे पोलिसांना समजत नव्हते. अथणी पोलिसांनी याचा तपास करत शोध घेतला. तपासात तिच्या बहिणीच्या पतीने हा खून केल्याचे स्पष्ट झाले. चार मुलांची आई, ती महिला तिच्या पाचव्या मुलाची अपेक्षा करत होती. महिलेने सुमारे 50000 रुपये भावोजीला दिले होते, प्रसूतीची तारीख जवळ आल्याने महिलेने पैसे परत मागितले. गर्भवती असल्यामुळे उपचारासाठी भावोजीकडे दिलेले पैसे मागितल्याने आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास अथणीचे उपनिरीक्षक उप्पार करीत आहेत.
Belgaum Chikud Village Athani Murder Arrested
Belgaum Chikud Village Athani Murder Arrested