कर्नाटक : #रासलीला DySP चा व्हिडिओ व्हायरल

Belgaum Belgavkar
2 Min Read

Tumakuru DYSP Viral Video

Tumakuru DYSP was caught on video engaging in misconduct with a woman

पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी….

कर्नाटक—belgavkar : राज्याचे गृहमंत्री डॉ जी. परमेश्वराच्या गृहजिल्ह्यातील ज्या पोलीसांना जनतेला न्याय द्यायला हवा तो पोलीस महिलेशी रासलीला करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जमिनीच्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी आलेली एक महिला अन् पोलिस ठाण्यातील रासलीलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस खात्याचे नाव खराब झाले आहे.

 

 

संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच महिला व बालकांसह राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेची शपथ घेणार्‍या गृहराज्यमंत्री डॉ. परमेश्वर यांच्या गृहजिल्ह्यात ही घटना घडली हे त्याहूनही घृणास्पद आहे. असे अधिकारी पोलीस खात्याचे नाव बदनाम करतात. तुमकूर जिल्ह्यातील मधुगिरी शहरातील डीवायएसपी कार्यालयात ही घटना घडली.

- Advertisement -

 

पावागड येथील एका महिलेने जमिनीच्या वादातून तक्रार केली होती. यासंदर्भात काही चौकशी करण्यासाठी महिलेला डीवायएसपी कार्यालयात बोलावण्यात आले. डीवायएसपी रामचंद्रप्पा यांनी तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून आपली वासना तृप्त करण्यासाठी तिचा वापर केला. न्याय मिळवायचा असेल, तर असे कामही करावे लागेल, असे DySP यांनी समजावून सांगितल्याने महिलेने डीवायएसपीची हौस भागवण्याची तयारी दर्शवली. यानंतर महिलेला डीवायएसपी कार्यालयाच्या शौचालयाजवळ घेऊन जात DySP रामचंद्रप्पाने महिलेसोबत रासलीला सुरू केली.

 

मात्र, कोणीतरी डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्या रासलीलेचे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये टिपले आहे. तो महिलेसोबत जबरदस्तीने फिरत असल्याची दृश्ये तेथे कैद झाली. आता या रासलीलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने संपूर्ण पोलीस विभाग हादरला आहे.

Tumakuru DYSP Viral Video
Tumakuru DYSP Viral Video

Tumakuru DYSP Viral Video

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *