बेळगाव : तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण @खानापूर

Belgaum Belgavkar
1 Min Read

 

तो शेताकडे गेला असल्याचे कळताच त्यांनी

बेळगाव—belgavkar—belgaum : क्षुल्लक कारणावरुन तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण करत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना देवलत्तीत (ता. खानापूर) घडली आहे. महेश सिमनगौडर (वय 35, रा. देवलत्ती ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बडस क्रॉसवर नेऊन तेथे आणखी काहींना

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काही दिवसांपूर्वी देवलत्तीतील एका तरुणाने अपशब्द वापरल्याचा आळ घेत काही जणांनी जाब विचारण्यासाठी त्याचे घर गाठले. पण, सदर तरुण घरी नव्हता. तो शेताकडे गेला असल्याचे कळताच त्यांनी बेकायदेशीररित्या त्याच्या शिवारात जाऊन त्याला मारबडव केली. त्याला आपल्या दुचाकीवर घालून त्याचे अपहरण केले.

बडस क्रॉसवर नेऊन तेथे आणखी काहींना बोलावून घेतले. या सगळ्यांनी लाथाबुक्क्यांनी पुन्हा मारहाण केली. यापैकी एकाने तरुणाच्या नाजूक जागेवरही मारहाण केली. तेथून तरुणाने आपली सुटका करुन खानापूर सरकारी दवाखान्यात उपचार करुन घेतले.

- Advertisement -

याप्रकरणी खानापूर तालुक्यातीलचं 8-10 अज्ञात तरुणांवर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

man kidnapped beaten in Khanapur Belgaum
man kidnapped beaten in Khanapur Belgaum

man kidnapped beaten in Khanapur Belgaum

 

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *