बेळगाव : बस तिकीट दरात 15 टक्याने वाढ @कर्नाटक

Belgaum Belgavkar
3 Min Read

Karnataka approves 15% hike in bus fares from Jan 5

15 per cent increase in ticket prices for KSRTC buses

Karnataka mulls 15% bus fare hike to ease financial strain

बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : कर्नाटक सरकारने बसप्रवाशांना नवीन वर्षात झटका दिला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आणि बंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) सह 4 महामंडळांच्या बस तिकीट दरात 15 टक्याने वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली.

BJP slams Shakti scheme

ही दरवाढ 5 जानेवारीपासून लागू होणार असल्याची माहिती कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिली. बस तिकीट दर वाढीमुळे चारही महामंडळांच्या मासिक महसुलात ७४.८५ कोटी रुपयांची वाढ होईल, असेही पाटील यांनी सांगितले. विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहन महामंडळाच्या बस तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली.

15 per cent increase in ticket prices for Karnataka

पाटील म्हणाले, भाडेवाढ झाल्यानंतरही कर्नाटकातील बस तिकिटांचे दर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या तुलनेत कमीचअसतील. बीएमटीसी, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), केडब्ल्यूकेआरटीसी आणि केकेआरटीसीसह चार परिवहन महामंडळांनी यापूर्वी ४० टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. डिझेलच्या किमतीत झालेली वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आला.

 

- Advertisement -

बीएमटीसीच्या बस तिकीट दरात २०१४ मध्ये वाढ केली होती, तर केएसआरटीसी, केकेआरटीसी आणि एनडब्ल्यूके आरटीसीचे भाडे २०२० मध्ये वाढविण्यात आले होते. तत्पूर्वी चार महामंडळांनी प्रस्ताव देण्यात आले होते. तिकिटात अनेक वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र तिकीट दर वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर तिकिटाच्या दरात एकदाही वाढ करण्यात आली नव्हती. महिलांसाठी मोफत बसप्रवासाची संधी देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेनंतर केएसआरटीसीचा महसूल किती आहे, हे स्पष्ट केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

 

‘शक्ती’ योजनेमुळे सरकारवर ३६५० कोटींचा बोजा पडला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अनेकदा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे केएसआरटीसीमधील नुकसानीचे स्पष्टीकरणही सरकारला सादर करण्यात आले होते. २०२० मध्ये डिझेलचा दर ६८ रुपये होता. २०२५ मध्ये ८८.९९ रुपये आहे. डिझेलच्या दरवाढीबरोबरच बसच्या सुट भागांच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे भाडेवाढ अपरिहार्य आहे, असे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी नुकतेच सांगितले होते.

The Karnataka government has announced a 15 per cent hike in bus fares across all four state-run transport corporations : Karnataka State Road Transport Corporation (KSRTC), Kalyana Karnataka Road Transport Corporation (KKRTC), North Western Karnataka Road Transport Corporation (NWKRTC), and Bengaluru Metropolitan Transport Corporation (BMTC), effective January 5.

 

Karnataka bus fares will increase by 15 per cent from January 5 across all four state-run transport corporations. The hike is expected to generate Rs 7.84 crore daily, easing financial stress on the transport companies. Meanwhile, the BJP blamed it on the free ride for women ‘Shakti scheme’.

15 per cent increase in ticket prices for Karnataka

 

15 per cent increase in ticket prices for Karnataka
TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *