बेळगाव : ₹ 308 कोटींची मद्यविक्री @कर्नाटक

Belgaum Belgavkar
2 Min Read

Liquor sales during New Year festivities in Karnataka touch Rs 308 crore

 

State sees record liquor sales worth ₹308 crore

 

बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्या आणि इतर ठिकाणी मद्याला मोठी मागणी होती. थर्टी फर्स्टच्या केवळ अर्ध्याच दिवसात राज्य पेय महामंडळाने ₹ 308 कोटींची मद्यविक्री केली. यातून कोट्यवधींचा अबकारी कर वसूल झाला. गतवर्षी 193 कोटींची मद्यविक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा दीडपट अधिक विक्री झाली.

 

- Advertisement -

मंगळवारी राज्यातील बहुतेक ठिकाणी नववर्ष साजरे करण्यासाठी पाट्यांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मद्य आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची रेलचेल होती. या दिवशी दुपारी 2 पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 308 कोटींची मद्यविक्री झाली. अबकारी खात्याने 250 कोटींचे मद्य विकले जाईल, असा अंदाज वर्तवला होता. पण, त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. गतवर्षी याचवेळी थर्टी फर्स्टनिमित्त एकूण 193 कोटींची मद्यविक्री झाली होती. यावर्षी 7,305 विक्रेत्यांनी पेय महामंडळाकडून महाखरेदी केले.

 

आयएमएलच्या 4,83,715 बॉक्सच्या विक्रीतून 250.25 कोटी रुपये, 2,92,339 बिअर बॉक्स विक्रीतून 57.75 कोटी रुपये, 7,76,042 बॉक्स मद्यविक्री झाली असून एकूण 308 कोटींचे उत्पन्न मिळाले.

नववर्षानिमित्त गेल्या शुक्रवारी विक्रमी 408.58 कोटींचे मद्य विक्रेत्यांनी खरेदी केले होते. आयएमएलच्या 6,22,062 वॉक्स विक्रीतून 327.50 कोटी रुपये, बिअरच्या 4,04,998 बॉक्सविक्रीतून 80.58 कोटी रुपये, असे एकूण 10,27,060 बॉक्सच्या विक्रीतून एकूण 408.58 कोटींचे उत्पन्न मिळाले.

 

Liquor sales during New Year festivities in Karnataka
Liquor sales during New Year festivities in Karnataka

Liquor sales during New Year festivities in Karnataka

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *