बेळगाव—belgavkar—belgaum : निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळला. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला. अभिषेक प्रसाद बन्नीकोप (वय 27, रा. हुबळी) असे जखमीचे नाव आहे. घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली असून हा अपघात बुधवारी सकाळी झाला.
अभिषेक बन्नीकोप हा ट्रक घेऊन मुंबईकडे जात होता. ट्रक घाटात आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला.त्यामुळे ट्रक सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे व अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला उपचारासाठी सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलविले.
घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिक उमादेवी यांनी घटनास्थळी भेट दिली.
Tawandi Ghat NH4 Belgaum truck gorge
Tawandi Ghat NH4 Belgaum truck gorge