Pune-Hubballi Vande Bharat Express given stop at Ghataprabha
Train No 20669 Hubballi-Pune @Ghataprabha
बेळगाव—belgavkar—belgaum : पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर बेळगाव जिल्ह्यात दुसरा थांबा मिळाला आहे. गुरुवार दि. 2 पासून घटप्रभा रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही वंदे भारतने पुणे व हुबळीपर्यंतचा वेगवान प्रवास करता येणार आहे.
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत वंदे भारतला घटप्रभा येथे थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्ह्यातला दुसरा थांबा घटप्रभा येथे देण्यात आला. यामुळे घटप्रभा, गोकाक, चिकोडी परिसरातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. या नवीन सेवेचा शुभारंभ गुरुवार दि. 2 रोजी सायंकाळी 7 वाजता घटप्रभा रेल्वेस्थानकावर होणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह नैऋत्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Train No 20669 Hubballi-Pune will arrive at Ghataprabha at 7.23 a.m. and leave at 7.25 a.m. Train No 20670 Pune-Hubballi will arrive at Ghataprabha at 7.38 p.m. and leave at 7.40 p.m.
The train has seven scheduled stops in its 558 km journey.
The Ghataprabha stop will be regularised by the Railways if the trial run is successful.
Vande Bharat Express given stop at Ghataprabha
The Vande Bharat Express train between Pune and Hubballi will stop at Ghataprabha Railway Station starting January 3, Rajya Sabha member Iranna Kadadi said here on Sunday.
Vande Bharat Express given stop at Ghataprabha
Vande Bharat Express given stop at Ghataprabha