Rohit Sharma to retire from Tests after Sydney game?
Rohit Sharma to retire from Tests after Border-Gavaskar Trophy in Sydney?
रोहित शर्मा 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये काही खास करू शकलेला नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतही रोहितला अपयश आले आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरत आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत नेतृत्व सांभाळताना विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रोहित संघात परतला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील 3 कसोटींचे निकाल पराभव, ड्रॉ आणि पराभव असे लागले.
ऑस्ट्रेलियाने मालिकेत 0-1 अशा पिछाडीवरून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. रोहितला ही मालिका अजूनही 2-2 अशी बरोबरीत राखू शकतो अशी आशा आहे आणि 3 जानेवारीपासून सिडनी कसोटीला सुरुवात होणार आहे. पण, रोहितने आता निवृत्तीचा निर्णय जवळपास पक्का केला आहे आणि BCCI व निवड समितीशी त्याने चर्चाही केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित स्वतःच्या कामगिरीमुळे त्रस्त आहे आणि चौथ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर त्यानेही हे मान्य केले आहे. जसप्रीत बुमराहच्या (30) विकेट्स पेक्षा रोहितने 6 डावात केवळ 1 (31) धावा जास्त केली आहे. रोहित म्हणाला, मी आहे तिथेच आहे. मागे काय घडलं याबाबत विचार करत नाही. काही निकाल हे आमच्या बाजूने लागलेले नाही, हे निराशाजनक आहे. मी प्रयत्न करतोय, परंतु मला अपेक्षित यश मिळत नाही. मनस्ताप होतोय.
रोहितच्या निवृत्तीबाबात मोठे अपडेट्स समोर आले आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीनंतर रोहित निवृत्ती जाहीर करेल, असे वृत्त TOI ने दिले आहे. त्याने याबाबत बीसीसीआय आणि निवड समिती यांच्याशी आधीच चर्चा केल आहे. रोहित त्याचा निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे. पण, भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरल्यास, तो निवड समितीला ही कसोटी खेळण्याची विनंती करू शकतो.
रोहित शर्माने कसोटी कारकीर्दित 67 सामन्यांत 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतकं व 18 अर्धशतकं आहेत आणि कसोटीतही त्याने 473 चौकार व 88 षटकार खेचले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 212 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. रोहितने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 1147 धावा केल्या आहेत.
Rohit Sharma to retire from Tests
Rohit Sharma to retire from Tests