For New Year’s Eve, Cops Keep Eye Out For Drunk Drivers, Troublemakers
New Year’s Eve
New Year 2025 Celebration
बेळगाव—belgavkar—belgaum : सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शहर उपनगरातील तरुणाई सज्ज झाली आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी हॉटेल, ढाबाचालकांचे नियोजन पूर्ण झाले आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना मांसाहार व मद्यपानाला ऊत येणार आहे. डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी विविध ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
Police sets 1 am curfew for New Year celebration
गेल्या आठवडाभरापासून थर्टी फर्स्ट कसा साजरा करायचा याचे नियोजन केले जात आहे. मार्गशीर्ष महिमा संपल्याने सर्वांचा उत्साह वाढला आहे. मंगळवारी दुपारपासूनच नियोजित ठिकाणी जल्लोष करण्याचे नियोजन तरुणाईने केले आहे. सरत्या वर्षात चांगल्या आणि वाईट गोष्टींचा मागोवा घेतला जातो. काही गोष्टी ठरवूनही झाल्या नसतील तर नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून करायचा मनोमन संकल्प केला जातो. थर्टी फर्स्टसाठी काही हॉटेलांनी ऑफर जाहीर केल्या आहेत. संभाव्य गर्दीचा विचार करुन हॉटेलचालकांनी जय्यत तयारी केली आहे.
एखाद्या पर्यटनस्थळावर जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे, अनेकजण बेळगाव व खानापूर तालुक्यातील पर्यटनस्थळासह गोव्यात जाऊन नववर्षाचे स्वागत करणार आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे.
गावात किंवा लगतच्या विशिष्ठ ठिकाणी अनेक तरुणांनी पार्टीचे नियोजन केले आहे. हॉटेलमधील जल्लोषाचे बजेट परवडणारे नसल्याने अनेक तरुणांनी हाऊस पार्टीला पसंती दिली आहे. त्यामुळे, निवांत ठिकाणी किंवा फार्महाऊसवर पार्टी करण्याचे बेत पक्के झाले आहेत. त्यामुळे, मंगळवारी अनेक मंडळींनी सकाळीच घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे.
मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तरुणाई रस्त्यावर दिसणार आहे. शहर उपनगरातील काही ग्रुपतर्फे ओल्डमॅन प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे. थंडी असली तरी संगीताचा ताल, फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत होणार आहे. अनेक तरुणांनी रात्री बारा वाजता नूतन वर्षाचे स्वागत करुनच जेवण करण्याचे ठरवले आहे.
मध्यरात्री एकपर्यंत मुभा : हॉटेल, पब आदींना रोज रात्री 11 पर्यंत मुदत दिली जाते. रात्री दहापासूनच पोलिसांकडून दरवाजा बंद करण्याची सूचना दिली जाते. नववर्षानिमित्त यामध्ये दीड तास वाढवून साडेबारापर्यंत मुदत देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत पार्त्या आणि मौजमजा सुरु राहण्याचा अंदाज आहे. याकरिता शहर आणि परिसरातील हॉटेल्सनी तयारी केली आहे. मध्यरात्री एकपर्यंत नववर्ष साजरे करण्यासाठी मुदत दिली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरासह परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सरकारने नवीन वर्षाच्या सणांसाठी कडक डेडलाइन निश्चित केली असून, फक्त मध्यरात्री 1 वाजेपर्यंतच उत्सवांना परवानगी दिली आहे. अधिका-यांनी भर दिला आहे की जनतेने त्यांच्या उत्सवासाठी निर्धारित वेळेच्या मर्यादेचे पालन केले पाहिजे.
The government has set a strict deadline for the New Year festivities, allowing celebrations only until 1 am. Authorities have emphasised that the public must adhere to the prescribed time limits for their celebrations.
New Year 2025 Celebration
New Year 2025 Celebration