कर्नाटक : 6 अय्यप्पा भक्तांचा मृत्यू….

Belgaum Belgavkar
1 Min Read

Hubballi fire mishap: Death toll rises to 6

Death toll in Hubballi gas cylinder blast rises to 6 as 2 Ayyappa devotees die

कर्नाटक—belgavkar—belgaum : @हुबळी : साईनगरमधील अच्चव्वा कॉलनीत मंदिरात रात्री झोपेत असताना घडलेल्या स्वयंपाक गॅस गळतीच्या घटनेत 9 अय्यप्पा भक्त गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील एकूण मृत्यूची संख्या 6 वर गेली आहे.

 

Death toll in Hubballi gas cylinder blast

शंकर चव्हाण आणि मंजुनाथ वाघमोडे अशी मृतांची नावे आहेत. आणखी तिघांवर किम्समध्ये उपचार सुरु आहेत. उणकल येथील शंकर चव्हाण यांनी यंदा पहिल्यांदाच अय्यप्पा स्वामी माळ धारण केली होती. 22 डिसेंबरला ईश्वर मंदिरात झालेल्या गॅस गळतीने आगीच्या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. सात दिवस त्यांच्यावर किम्समधील अतिदक्षता
गृहात उपचार सुरु होते. शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. रविवारी उपचारादरम्यान मंजुनाथ वाघमोडेचा मृत्यू झाला.

- Advertisement -

गेल्या रविवारी घडलेल्या घटनेत एकूण 9 अय्यप्पा भक्त जखमी झाले होते. त्यांना तात्काळ किम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण, गेल्या सात दिवसांत एकूण ६ भक्तांचा मृत्यू झाला. निजलिंगप्पा बेपुरी (५८), संजय सौंदत्ती (२०), राजू मुगेरी (२१), लिंगाराजू बिरनूर (२४), शंकर चव्हाण (२९) आणि मंजुनाथ वाघमोडे अशी मृतांची नावे आहेत.

Death toll in Hubballi gas cylinder blast
Death toll in Hubballi gas cylinder blast

Death toll in Hubballi gas cylinder blast

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *