बेळगाव—belgavkar—belgaum : वैभवनगर येथील सेवा रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी दोघांचा वैद्यकीय उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. संतोष लव पाटील (रा. कंकणवाडी, ता. चिक्कोडी, सध्या रा. कंग्राळी बी. के., बेळगाव) आणि उजेफ गुलाब सय्यद (रा. वैभवनगर, ता. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अपघात घडल्यानंतर जखमी दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी सांगितले की, दुचाकीस्वार संतोष पाटील याच्या दुचाकीच्या मागील सीटवर हर्षा अशोक पाटील (रा. सिद्धेश्वरनगर, काकती, ता. बेळगाव) बसला होता. केएलई हॉस्पिटलकडून हिंडाल्को सर्कलच्या सेवा रस्त्यावरुन दुचाकी चालवीत वैभवनगर येथील शूज शोरूमजवळ पोहोचल्यानंतर याठिकाणी समोरून येणाऱ्या उजेफ सय्यद याच्या दुचाकीला धडक दिली. या ठिकाणी दोघा दुचाकीस्वारांनी एकमेकांना न पाहिल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये हर्षा पाटील याला किरकोळ दुखापत झाली आहे. तर दुचाकीस्वार संतोष गंभीर जखमी झाला.
खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यातआले. त्याला प्रतिसाद दिला नाही व गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तसेच उजेफला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानेही उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
वैभवनगर येथील अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव उत्तर वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या. जखमी दुचाकीस्वारांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बेळगाव उत्तर वाहतूक पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
2 youths die in Vaibhavnagar accident Belgaum
2 youths die in Vaibhavnagar accident Belgaum