इंजेक्शनला घाबरणे सोडा, वेदना न होणाऱ्या सुईचा शोध | shock syringe

Belgaum Belgavkar
3 Min Read

IIT-Bombay offers painless ‘shock syringe’ alternative to needle

needle-free shock syringes for painless treatments

 

  • IIT मुंबईचा शॉक सिरिंजमुळे उपचार सोपे
  • शॉक सिरिंज | वेदनारहीत इंजेक्शन

 

shock syringe : इंजेक्शनला घाबरणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांना आता इंजेक्शनच्या सुईमुळे होणाऱ्या वेदना होणार नाही. यासंदर्भात आयआयटी मुंबईच्या संशोधनकर्त्यांनी एक वेगळे संशोधन केले आहे. आयआयटीने शॉकवेव आधारित सुई विरहित सिरिंज विकसित केली आहे. त्यामुळे वेदनारहीत सुरक्षित इंजेक्शन लागणार आहे.

 

- Advertisement -

सुईच्या भीतीमुळे डॉक्टरांकडे उपचार न घेणारे किंवा लस न लावणाऱ्यांसाठी हे संशोधन वरदान घेणार आहे. वारंवार इन्सुलिन घ्यावा लागणाऱ्या डायबिटीज रुग्णासाठी हे संशोधन फायद्याचे ठरणार आहे. आयआयटी बॉम्बच्या एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या टीमने शॉक सिरिंज सुई असणारी सिरिंज बनवली आहे (shock syringe). त्यामध्ये हाय एनर्जी शॉक वेवचा वापर होणार आहे. या वेव ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेगाने त्वचा भेदत शरीरात औषध पोहचवते.

एक्सपर्टचे काय म्हणतात? : शोधार्थी प्रियंका हंकारे यांनी या शॉक सिरिंज इंजेक्शनचे डिझाइन तयार केले आहे. त्या म्हणतात, ही सिरींज औषध वेगाने योग्य ठिकाणी पोहचवते. ती सामान्य सिरिंजच्या तुलनेत त्वचा आणि टिश्यूंना जास्त नुकसान करत नाही. तिचे नोझल 125 मायक्रोन (एक मानवी केसापेक्षा कमी) कमी ठेवले गेले आहे. त्यामुळे वेदना जाणवत नाही.

शॉक सिरिंजचा विकास केवळ वेदनारहीत इंजेक्शनपर्यंत मर्यादीत असणार नाही. हे एक हजारापेक्षा जास्त इंजेक्शन शॉट्स देण्यास सक्षम आहे. त्याचा खर्चही कमी असणार आहे. ज्या ठिकाणी वारंवार इंजेक्शन वापरावे लागते त्या ठिकाणी हे संशोधन क्रांतीकारक ठरणार आहे.

शॉक सिरिंज सुईने साधारण सिरिंजपेक्षा समान किंवा चांगले परिणाम दिले आहेत. उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे.

शॉक सिरिंज त्वचेला कमी नुकसान करून औषध त्वचेत खोलवर पोहोचवते.
इन्सुलिन इंजेक्शनमध्ये अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.
सुईच्या तुलनेत कमी सूज आणि जलद जखमा बरे झाल्याचे दिसून आले.
चिकट औषधे (जसे की अँटीफंगल्स) इंजेक्शनमध्ये सुईपेक्षा ते अधिक प्रभावी होते.

A team led by Prof. Viren Menezes from IIT Bombay’s Department of Aerospace Engineering has developed a shockwave-based syringe that delivers medication without piercing the skin with a sharp needle. Instead, it uses high-energy shock waves to create a microjet of liquid drugs.

 

Led by Prof Viren Menezes from the department of aerospace engineering, IIT Bombay researchers have developed a needle-free solution: The shock syringe. It uses high-energy shock waves, traveling faster than sound, to gently and effectively deliver drugs without piercing the skin with a needle. Their research on laboratory rats has been published in the ‘Journal of Biomedical Materials & Devices’.

#IITBombay #ShockSyringe #NeedleFree #PainlessInjection #MedicalInnovation #HealthcareRevolution #DiabetesCare #PainFreeTreatment #AerospaceEngineering #ResearchAndDevelopment #SafeInjections #HealthTech #MedicalBreakthrough #InjectionFear #PatientComfort #InsulinDelivery #FutureOfMedicine #NonInvasive #HealthAwareness #TechnologyInHealthcare

 

shock syringe

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *