बेळगाव—belgavkar—belgaum : चिक्कोडी : कारगाडी पाठीमागे घेत असताना मागील चाकाखाली आल्याने 23 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. तालुक्यातील खजगौडनहट्टी गावात बुधवारी ही घटना घडली. अनुश्री रामकृष्ण खोत (वय 23 महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, तालुक्यातील खजगौडनहट्टीत खोत कुटुंब राहते. बुधवारी त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्ती मोटार मागे घेऊन घराजवळ पार्किंग करत होता. यावेळी ही 23 महिन्यांची चिमुरडी मागे आलेली त्याला दिसले नाही. मोटार मागे घेताना मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला.
ही घटना पाहून लागलीच तिला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिस उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली यांनी भेट देऊन पाहणी केली. चिक्कोडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
#accident #tragedy #childsafety #roadaccident #safetyfirst #vehicularaccident #loss #grief #communitysupport #awareness #preventivecare #family #heartbreak #mourn #safetyawareness #childprotection #emergencyresponse #policeinvestigation #localnews #supportsystem
accident tragedy child safety road car chikodi belgaum