आजकाल मोबाईल नाही असा एकही व्यक्ति सापडणार नाही. आणि सध्या ५जी (5G) मोबाइल ची क्रेज आहे कारण कधी ४जी तर कधी ५जी खुप कंपन्या प्रमोशन साठी फ्री मधे ही नेटवर्क आणि इंटरनेट (INTERNET) देत आहेत. सध्या च्या काळात मोठ्या स्क्रीन चे मोबाइल येत आहेत आणि जास्त काळ मोबाइल चालावा यासाठी कंपन्या ब्याटरी जास्त एम. ए. एच. (MAH) च्या देत आहेत. तसेच चार्जिंग फ़ास्ट व्हावे यासाठी ही चार्जर ही फ़ास्ट (FAST CHARGER) भेटत आहे. या सर्वांचा परिणाम मोबाइल लवकर गरम होने आणि फूटने (MOBILE BLAST) असे प्रकार वाढत चालले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बिहार (BIHAR) येथील नाथनगर या परिसरातील एका तरुणाच्या खिशातच मोबाइल च स्पोट झाला आहे. माहितीनुसार बिहार मधील शांति समितीचे सक्रीय सदस्य श्री. संजयकुमार यादव यांचा लहान भाऊ जयदेव यादव याच्या खिशात हां मोबाइल फुटला आहे. मोबाइल वर फोन आल्यामुले फोन घ्यायला गेला आणि खिशातच मोबाइल च स्पोट (MOBILE BLAST) झाला.
सविस्तर घटना अशी की, जयदेव यादव हा अंघोळ करुण बाहेर आला. त्याने हाफ पेंट घातली होती आणि मोबाइल पेंट च्या खिशात होता. मोबाइल वर कुणाचा तरी फोन आल्यामुले त्याने फ़ोन घेण्यासाठी पेंट च्या खिशात हात घालणार तोच मोबाइल चा स्पोट (MOBILE BLAST) झाला आणि आवाज आला. संजय यादव यांच्या म्हनन्यानुसार हा स्पोट झाला तेव्हा काही वेळ जयदेव ला काय झाले हे कळलेच नाही जेव्हा पाया च्या बाजूने रक्त आले तेव्हा कळले की पायाला दुखापत झाली आहे. या स्पोटमुले त्याची पूर्ण पेंट आणि अंडर गारमेंट जळले आणि पायाला मोठी जखम झाली आहे.
कुटुंबातिल व्यक्तीचे म्हणने आहे की, मोबाइल जर कानाजवळ आल्यावर फुटला असता तर खुप मोठी जखम झाली असती. त्यांच्या म्हनन्या नुसार बरेच दिवस पकिस्तान (PAKISTAN) देशाच्या नंबर म्हणजेच सुरुवात +९२ अश्या नंबर वरुण खुप बनावट फोन येत आहेत. कधी ते पैसे मागतात तर कधी मोबाइल हैक करतात. पुढील तपास चालु आहे.