बेळगाव—belgavkar—belgaum : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोक्सो न्यायालयाने 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 10000 रुपयांचा दंड ठोठावला. अनिल रामा ऊर्फ तम्मानी लंबुगोळ (वय 29, रा. मांजरी, मुगोळखोड, ता. चिकोडी) असे आरोपीचे नाव आहे.
4 एप्रिल 2022 रोजी पीडित बालिकेच्या घरात प्रवेश केला. झोपी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून आरडाओरड केलीस तर जिवे मारु, अशी धमकी देत तिचे अपहरण केले. त्यानंतर उसाच्या फडात नेऊन बलात्कार केला.
दारू पाजून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यामुळे या प्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी एन. एस. परमानट्टी यांनी पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल केला. १० साक्षी, ६७ पुरावे, ९ मुद्देमाल तपासल्यानंतर आरोप सिद्ध झाला. आरोपीला न्या. सी. एम. पुष्पलता यांनी २० वर्षांचा कठोर कारावास, १० हजार दंड ठोठावला. कायदा सेवा प्राधिकारणकडून १ लाखाची आर्थिक मदत देण्याचा आदेश बजावला. सरकारतर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
#Belgaum #JusticeForVictims #PocsoAct #ChildSafety #EndChildAbuse #LegalAction #SupportSurvivors #CrimeAgainstWomen #ProtectOurChildren #AwarenessCampaign #StopViolence #VictimSupport #ChildRights #SafetyFirst #EmpowerWomen #SpeakUp #LegalJustice #CommunitySupport #HumanRights #JusticeServed
Minor girl kidnapped and raped Court Belgaum
Minor girl kidnapped and raped Court Belgaum