बेळगाव : 2 दिवस शाळांना सुट्टी

Belgaum Belgavkar
2 Min Read

100th anniversary of Belgaum session

 

100 years of Mahatma Gandhi taking over as President of party

 

महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील 1924 च्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी उत्सवाचे स्मरण

बेळगावमध्ये 1924 मध्ये महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अधिवेशन शतक महोत्सव

 

Centenary celebration of Mahatma Gandhi’s historic 1924 Belgaum Session

 

The 39th session of the Indian National Congress, held in Belgaum in 1924, was the only Congress session presided over by Mahatma Gandhi.

 

- Advertisement -

बेळगाव—belgavkar—belgaum : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना 26 आणि 27 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे.

उद्यापासून दोन दिवस गांधी भारत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच बेळगाव शहर व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये 26 डिसेंबर 1924 रोजी झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उद्या शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील काँग्रेस नेते उद्या बेळगावमध्ये दाखल होणार असून गांधी भारत या उपक्रमांतर्गत नव सत्याग्रह बैठक होणार आहे.

 

26 डिसेंबर 1942 रोजी महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाय काँग्रेसच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड याच अधिवेशनात झाली होती. त्यानिमित्ताने काँग्रेसकडून 26 डिसेंबर ते 27 डिसेंबर रोजी विविध उपक्रमांचा आयोजन करण्यात आले असून देशभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या निमित्त उद्या काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक बेळगावात पार पडणार आहे. देशभरातून 200 पेक्षा अधिक नेते यासाठी दाखल होणार आहेत.

#Belgaum #Gandhi100 #BelgaumSession #MahatmaGandhi #CentenaryCelebration #SchoolHoliday #GandhiBharat #BelgaumHistory #IndianNationalCongress #1924Session #GandhiLegacy #EducationForAll #BelgaumEvents #GandhiJayanti #CulturalHeritage #HistoricalCelebration #CommunityEvent #GandhiInspiration #BelgaumSchools #GandhiPhilosophy

100th anniversary of Belgaum session

100th anniversary of Belgaum session

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *