5 soldiers killed as Army vehicle falls into gorge in JKs Poonch
5 soldiers killed, 5 injured as Army vehicle plunges into gorge in JKs Poonch
350 फूट दरीत कोसळली सैन्यदलाची गाडी, 5 जवानांचा जागीच मृत्यू
जम्मू काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी इथे एक भारतीय सैन्यदलाची एक गाडी दरीत कोसळली आहे. या गाडीचा मेंढरच्या बलनोई परिसरात रस्ता चुकला होता. यानंतर ही गाडी खोल दरीत कोसळली आहे. आतापर्यंत 5 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन उलटल्याने बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारे जवान दयानंद तिरकण्णवर शहीद झाले आहेत. दयानंद हे जवळच्याचं सांबरा गावचे जावई आहेत. या घटनेचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री आणि सांबरा गावावर शोककळा पसरली आहे. दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील एका जवानासह 5 भारतीय जवान शहीद झाले. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावातील धर्मराजा सुभाष खोत हा या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांपैकी एक असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव कर्मचाऱ्यांनी पाच मृत सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
या दुर्घटनेत 5 सैनिक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. सैनिकांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जात आहे. काहीजण गंभीर जखमी असल्याचं बोललं जात आहे (incident took place around 5.40 pm when the Army vehicle of Madras Light Infantry (MLI) was on its way from Nilam Headquarters to Balnoi Ghora Post).
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी या गाडीला अपघात झाला, त्यावेळी गाडीतून 10 जवान प्रवास करत होते. यातल्या 5 जवानांचा मृत्यू झाला आहे, तर इतर जवानांवर उपचार सुरू आहेत. ही गाडी नीलम मुख्यालयापासून बलनोई घोरा पोस्टच्या दिशेनं जात होती. 11 एमएलआय ही गाडी घोरा पोस्टजवळ जाताच वाहनाला अपघात झाला. ही गाडी जवळपास 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच क्यूआरटी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्याला सुरुवात झाली.
भारतीय सैन्यदलाच्या व्हाइट नाईट कोर्प्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिलं की, व्हाइट नाइट कॉर्प्सचे जवान पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर होते. त्यांच्या वाहनाला अपघात झाला असून यात 5 जिगरबाज जवांनाचा मृत्यू झाला आहे. याबाबत आम्ही संवेदना व्यक्त करतो. बचावकार्य सुरू आहे. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत.
All ranks of #WhiteKnightCorps extend their deepest condolences on the tragic loss of five brave soldiers in a vehicle accident during operational duty in the #Poonch sector.
Rescue operations are ongoing, and the injured personnel are receiving medical care.@adgpi…— White Knight Corps (@Whiteknight_IA)
Army vehicle falls into gorge in JKs Poonch Belgaum
Army vehicle falls into gorge in JKs Poonch Belgaum
Army vehicle falls into gorge in JKs Poonch Belgaum
Army vehicle falls into gorge in JKs Poonch Belgaum
Army vehicle falls into gorge in JKs Poonch Belgaum