बेळगाव : हिंडलगा जेल व्हिडीओ व्हायरल

Belgaum Belgavkar
2 Min Read
  • हिंडलगा कारागृह चर्चेत;
  • पैसे द्या अन् मटण, मासे खा
  • रक्कम दिल्यास हवे ते…

 

बेळगाव—belgavkar—belgaum : विविध प्रकारांमुळे नेहमीच लक्ष वेधून घेणारे हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कैद्याला चमचमीत व त्याच्या आवडीचे जेवण हवे असेल अन् त्यासाठी पैसे मोजायची तयारी असेल तर मटण वा मासळीचे जेवण उपलब्ध दिले जाते असा आरोप होत आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने कारागृहातील गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी दिल्याने हिंडलगा कारागृह देशाच्या नकाशावर आले होते. यानंतर कारागृहात सातत्याने बेकायदेशीर कृत्ये घडत असतात. उंच संरक्षक भिंतीवरुन गांजा आत घेणे, कैद्यांमधील हाणामारी असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी कैद्याचा जेलरवर हल्ला, जुगार, अनेकांकडे सातत्याने मिळणारे मोबाईल व अन्य आक्षेपार्ह वस्तू आदींमुळेही कारागृहाचे नाव बदनाम झालेले आहे. आता या कारागृहात एखाद्या कैद्याच्या आवडीप्रमाणे जेवण मिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कारागृहात आठवड्यातून एकदा चिकन व मटण दिले जाते. परंतु, मासे दिले जात नाहीत. एखाद्या कैद्याला जर मासे खायचे असतील तर याचीही व्यवस्था केली जाते. गेल्या काही दिवसांपासून दोन कैदी पोलिसांना बोलावून पैसे देत असल्याचा व तिथे ठेवलेल्या कच्च्या मासळीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कैद्याकडून दिली जाणारी ही रक्कम आवडीचे जेवण बनवून देण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

बेळगावात झालेल्या अधिवेशनात विधानसभा सभागृहात गृहमंत्री जी. परमेश्वर यांना हिंडलगा कारागृहातील बेकायदेशीर घडामोडीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु, येथे काहीही चुकीचे घडत नसल्याचे स्पष्टीकरण देत गृहमंत्र्यांनी आपली बाजू सावरली होती. परंतु, आता जे घडते आहे, याकडे गृहमंत्री लक्ष देऊन कारवाई करणार का, हा प्रश्न आहे.

#Belgaum #HindalagaJail #PrisonCorruption #ViralVideo #FoodInPrison #IllegalActivities #NitinGadkari #PrisonLife #JusticeSystem #CrimeNews #IndianPrisons #BelgaumNews #PrisonFood #GanjaInPrison #PrisonViolence #MobilePhonesInJail #ChickenAndMutton #PrisonerRights #LawAndOrder #GovernmentAccountability

Belgaum Hindalaga Jail Corruption Viral Video
Belgaum Hindalaga Jail Corruption Viral Video

Belgaum Hindalaga Jail Corruption Viral Video

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *