करोडपती कॉन्स्टेबल…. ₹ 91 कोटींच्या व्यवहारांचे रेकॉर्ड

Belgaum Belgavkar
4 Min Read

ED registers money laundering case against ex-constable Sharma

From constable to crorepati – why transport official’s ‘lavish lifestyle’ is under scrutiny

ईडीने 300 किलो सोनं-चांदी, 10 कोटींपेक्षा जास्त पैसे जप्त केले

गेल्या आठवडाभरापासून मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. लोकायुक्त छाप्यातील मुख्य आरोपी माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा कुठे आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. आता सौरभ शर्माच्या नावाने समन्स जारी करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात लोकायुक्तांच्या छाप्यात एका कारमध्ये 52 किलो सोन्याची बिस्किटे सापडली होती. तेव्हापासून महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) सोन्याच्या बिस्किटांचा स्रोत शोधण्यात व्यस्त आहे. सध्या तपास यंत्रणा सौरभ शर्मा दुबईहून परतण्याची वाट पाहत आहेत. दुबईहून परतल्यानंतर सौरभ आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

लोकायुक्त डीजी जयदीप प्रसाद यांनी सांगितलं की, सौरभ शर्मा, चेतन गौर यांच्यासह शरद जयस्वाल नावाच्या व्यक्तीला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. कारण छाप्यांमध्ये त्यांच्या नावावर असलेल्या काही मालमत्तेची कागदपत्रंही सापडली आहेत. सौरभच्या ठावठिकाणाबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही, त्यामुळे त्याला समन्स बजावण्यात आला आहे. सौरभ देशात किंवा परदेशात कुठेही असला तरी त्याला येथे आणलं जाईल.

- Advertisement -

भोपाळमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन मोठे छापे टाकण्यात आले, त्यातील सर्वात मोठा छापा हा निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्माच्या घरावर टाकण्यात आला होता. छाप्यादरम्यान सौरभ शर्माच्या घरातून २.५ कोटी रुपये रोख आणि ४० कोटी रुपयांहून अधिक किमतीची चांदी जप्त करण्यात आली. याशिवाय त्रिशूल कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणाहून तीन कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. अशा परिस्थितीत पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.

ग्वाल्हेरचा रहिवासी असलेल्या सौरभ शर्माला वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर वाहतूक विभागात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली. 12 वर्षांच्या सेवेनंतर त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि रिअल इस्टेट तसेच इतर कामांची सुरुवात केली. सौरभच्या घरात लोकायुक्तांच्या छाप्यादरम्यान सौरभच्या घरात भूमिगत लॉकर सापडले असून त्यात चांदी आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्याकडे मध्य प्रदेशच्या निम्म्या वाहतूक चेकपोस्टची जबाबदारी होती. या चेकपोस्टमध्ये येणाऱ्या सर्व रोख रकमेचा तो स्वतः व्यवहार करत असे. चेकपोस्टवर तैनात असलेल्या इन्स्पेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांचा ‘हिस्सा’ तोच ठरवायचा. त्याच्या कामात कोणताही अधिकारी किंवा निरीक्षक ढवळाढवळ करत नव्हता.

जयदीप प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ शर्माचा हवाला नेटवर्कशी संबंध असण्याची शक्यता असल्याने या पैलूचाही तपास केला जात आहे, मात्र आतापर्यंतच्या तपासात हवाला नेटवर्कचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

माहितीनुसार, सौरभच्या डायरीमध्ये डिसेंबर 2024 पर्यंत 97 कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद आहे, ज्याची चौकशी केली जात आहे. सध्या सर्व कागदपत्रं आणि डायरी सील आहे, परंतु डीजी लोकायुक्तांनी डीएसपी वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय टीम तयार केली आहे, जी या प्रकरणाची चौकशी करेल.

डायरीत कोट्यवधींच्या व्यवहारांची नोंद असेल, तर हा पैसा कुठून आला आणि हा पैसा कोणाकडे जाणार होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न टीम करणार आहे. या खुलाशावर सध्या तपासाची दिशा अवलंबून आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

#MoneyLaundering #ED #Corruption #SaurabhSharma #Bhopal #GoldSeizure #SilverSeizure #RTO #TransportDepartment #PoliticalScandal #Investigation #RealEstate #LuxuryLifestyle #CrimeNews #India #LawEnforcement #AssetSeizure #UnderScrutiny #Dubai #Justice

money laundering case against ex-constable Sharma

money laundering case against ex-constable Sharma
money laundering case against ex-constable Sharma

money laundering case against ex-constable Sharma

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *