कर्नाटक : बेंगळुरू : एका महिलेने डीके सुरेशची बहीण असल्याचे सांगून सोने खरेदी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. माजी खासदार डीके सुरेश (उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ) यांची बहीण असल्याचा दावा करणाऱ्या ऐश्वर्या गौडा नावाच्या महिलेने फसवणूक केली. आरआरनगर येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या गौडा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वाराही वर्ल्ड ऑफ गोल्ड शॉपच्या मालकाने ऐश्वर्या गौडा यांनी 8.41 कोटी रुपयांचे सोने खरेदी करून फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. चंद्रा लेआऊट येथील वाराही वर्ल्ड ऑफ गोल्ड ज्वेलरी शॉपच्या मालक वनिता यांनी ऐश्वर्या गौडा विरोधात तक्रार दाखल केली आहे.
ऑक्टोबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत ऐश्वर्या गौडा यांना टप्प्याटप्प्याने सोने मिळाले होते, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच, एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली आहे की, जेव्हा ऐश्वर्याकडे पैसे मागितले तेव्हा तिने डीके सुरेश यांना फोन करून वेळ मागितली. धर्मेंद्र नावाच्या व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
ऐश्वर्या गौडाचा पती हरीश केएनवरही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मी डीके सुरेश यांची बहीण आहे, अनेक राजकीय व्यक्तींशी माझा संबंध आहे. मी एक मोठी व्यावसायिक महिला आहे. एक चांगला बिझनेस डील देईन असे सांगून ऐश्वर्यावर वनिताने विश्वास ठेवल्याचे सांगितले जाते. ज्वेलरी शॉपच्या मालक वनिता यांनी सद्यस्थितीबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
DK Suresh Sister Gold Fraud
DK Suresh Sister Gold Fraud