मैत्रिणीला 4BHK फ्लॅट गिफ्ट, डायमंडचा चष्मा अन् पगार फक्त ₹ 13000 #कांड

Belgaum Belgavkar
3 Min Read

छत्रपती संभाजीनगर @महाराष्ट्र : एका कंत्राटी कर्मचाऱ्याने आपल्या मैत्रिणीला चक्क 4 BHK चा फ्लॅट गिफ्ट केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याचा ₹ 13000 रुपये इतकाच पगार आहे. या 13 हजार पगार असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 22 कोटींचा झोल केला असल्याचे समोर आले आहे.

या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून झोलझाल केला आहे. या दोघांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला ₹ 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली. तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली असल्याचे तपासात समोर आले.

तर, दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाखांची एसयूव्ही कार खरेदी केली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. हर्षकुमार अनिल क्षीरसागर असे मुख्य आरोपीचे नाव असून तो एसयूव्ही कार घेऊन फरार झाला आहे.

क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते. या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो. मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बीके जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंग साठी ऍक्टिव्हेट करुन त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. विशेष म्हणजे विभागीय उपसंचालकाच्या 6 महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

- Advertisement -

क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बैंकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार क्षीरसागर आणि शेट्टी यांच्या खात्यात ₹ 59 कोटींची रक्कम आली.

नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते. 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी 7 लाख 82 हजार रुपयांचा निधी आला.

 

कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करीत असताना क्रीडा उपसंचालक, बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आयकर विभागाच्या नोटिसाही आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. डल्ला मारलेल्या या पैशांमध्ये मुख्य आरोपी हर्ष कुमार शिरसागर याने आपल्या मैत्रिणीला आलिशान फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट केला. तर, डायमंडचा चष्मा वापरला आणि बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरली.

 

#4BHK #Gift #Diamond #Fraud #Maharashtra #ChhatrapatiShivajiNagar #ContractEmployee #Scam #InternetBanking #LuxuryLife #BMW #Apartment #Jewelry #Investigation #Corruption #MoneyLaundering #RealEstate #LuxuryCars #Wealth #CrimeNews

Chhatrapati Sambhajinagar Fraud Accused 13000 salary.  Chhatrapati Sambhajinagar Fraud Accused 13000 salary. Chhatrapati Sambhajinagar Fraud Accused 13000 salary.

Chhatrapati Sambhajinagar Fraud Accused 13000 salary

Chhatrapati Sambhajinagar Fraud Accused 13000 salary

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *