बेळगाव—belgavkar—belgaum @गोगाक : घटप्रभा येथे घटप्रभा-हुक्केरीदरम्यान असणाऱ्या प्रख्यात दवाखान्याच्या आवारात ऊसतोडणी कामगार विलास बाळासाहेब जोगदंड (वय 28, रा. असोलंबा, ता. परळी, जि. बीड, महाराष्ट्र) याचा त्याचाच मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय 47, रा. असोलंबा, ता. परळी, जि. बीड) याने झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली.
घटप्रभा जे. जे. हॉस्पिटलनजीकची घटना
घटप्रभा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विलास याने उपचारासाठी जेजे दवाखान्यात आणले होते. दवाखान्यात दाखल करून विलास दवाखान्याबाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गुरुसिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास झोपला होता. ढाकणे याने दवाखान्याबाहेर येऊन कळायच्या काही आत विलासच्या डोक्यात दगड घातला. यावेळी दोघांच्यात झटापट पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने ताबोडतोब ढाकणे याला पकडले.
घटप्रभा पोलिसांना याबाबत माहिती दिली. ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मृताचे वडील बाळासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्रभा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या खुनाचे कारण समजू शकले नाही. घटप्रभा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
उपचारावेळी पैशाच्या देवघेवीतून दोघांमध्ये वाद झाल्याची घटनास्थळी चर्चा होती. या घटनेने मजूर टोळीचे धाबे दणाणले आहेत.
#Belgaum #Ghataprabha #Murder #SugarCane #Mukadam #CrimeNews #PoliceInvestigation #JusticeForVictim #LocalNews #Maharashtra #SafetyConcerns #CommunityAlert #WorkerSafety #IncidentReport #CrimeScene #BelgaumNews #GhataprabhaPolice #MurderMystery #SocialIssues #Awareness
Belgaum Ghataprabha Murder Sugar Crop Mukadam
Belgaum Ghataprabha Murder Sugar Crop Mukadam