Govindram Seksaria Science (Autonomous) College
“Seksarians 24 Reconnect and Rejoice” – grand alumni reunion
बेळगाव—belgavkar—belgaum : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी (दि. 28 डिसेंबर) महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स 24 : रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे.
Join us for the MEGA REUNION Of Graduate & Post Graduate students
महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित व खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे दोन माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. एसकेई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर अध्यक्षस्थानी असतील. जीएसएस महाविद्यालयाला मिळालेल्या स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जाची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी तसेच जुन्या मित्र मैत्रिणींना महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा भेटता यावे यासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या बॅचपासूनचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते ५ या वेळेत महामेळावा होणार आहे. सकाळी १० ते११ नोंदणी होणार आहे. सकाळी ११ ते १२ उद्घाटन सोहळा तसेच माजी प्राचार्य व प्राध्यापकांचा सत्कार केला जाणार आहे. दुपारी १२ ते १.३० या वेळेत पुनर्मिलन व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येईल. दुपारी १.३० ते ३ स्नेहभोजन व समूह छायाचित्र कार्यक्रम होईल. दुपारी ३.३० नंतर खुल्या रंगमंचावर गॅदरिंगच्या धर्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
28 December 2024 From 10am to 5pm at G.S.S College, Belagavi
महामेळाव्याच्या नावनोंदणीला उदंड प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत 800 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बेळगावबाहेर राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनाही महामेळाव्यात सहभागी होता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाढता प्रतिसाद व मागणीचा विचार करुन नावनोंदणीची मुदत 25 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून अद्याप नोंदणी न केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामेळावा संयोजन समितीने केले आहे.
#Belgaum #GSSCollege #AlumniReunion #ReconnectAndRejoice #Seksarians24 #GovindramSeksaria #CulturalEvent #BelgaumEvents #CollegeMemories #OldFriends #BelgaumAlumni #SKEESociety #PrasadPandit #VithalHalgekar #KiranThakur #AutonomousCollege #Gathering #Nostalgia #RegistrationOpen #BelgaumCommunity
Belgaum GSS College Alumni Reunion
Belgaum GSS College Alumni Reunion
I am past student of GSS. I have already sent payment for registration rs 800 (with accompany). I will be glad to attend the function.