बेळगाव : बाळंतिणीचा मृत्यू | maternal death in BIMS

Belgaum Belgavkar
1 Min Read

maternal death in BIMS

 

Another maternal death in BIMS, kin allege medical negligence

 

 

  • डॉक्टरांची हलगर्जी
  • महिलेच्या आईची पोलिसांत फिर्याद
  • बिम्समध्ये प्रसूतीसाठी दाखल महिलेचा मृत्यू
  • Belgaum Institute Of Medical Sciences

 

- Advertisement -

बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव येथील बिम्समध्ये (BIMS – Belgaum Institute Of Medical Sciences) प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, अशी फिर्याद महिलेच्या आईने एपीएमसी पोलिसांत दिली आहे. वैशाली इराण्णा कोटबागी (वय 20, रा. गौडवाड, ता. हुक्केरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

वैशाली प्रसूतीसाठी शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास येथील बिम्स जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. डॉक्टरांनी सिझेरियन करावे लागेल, असे सांगितल्याने कुटुंबीयांनी परवानगी दिली. त्यांनी मुलीला जन्म दिल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडू लागली. डोकेदुखी, पोटदुखी यासह तिच्या छातीतही दुखू लागले. यावेळी डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

 

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत महिलेची आई मंजुळा बाळाप्पा जिरली (रा. गौंडवाड) यांनी दिली आहे. त्यानुसार याची एपीएमसी पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक उस्मान आवटी पुढील तपास करत आहेत.

 

#Belgaum #Belgavkar #HealthCare #MedicalNegligence #MaternalHealth #PatientRights #JusticeForWomen #Csection #HospitalCare #WomenEmpowerment #SafetyInHealthcare #HealthAwareness #MaternityCare #PoliceReport #FamilySupport #HealthcareSystem #WomenInCrisis #MedicalEthics #CommunitySupport #AdvocacyForChange

maternal death in BIMS

maternal death in BIMS

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *