Chhattisgarh Mahtari Vandan Scheme
‘महतारी वंदन योजना’ ही छत्तीसगड सरकारची एक गेमचेन्जर योजना मानली जाते. मात्र, यात मोठी गडबड होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचेही नाव समाविष्ट झाले आहे. यावरुन आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, चुकीच्या नावावर निधी वर्ग केला जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सनी लिओन नावाच्या लाभार्थीच्या खात्यात दर महिन्याला ₹ 1000 रुपये जात आहेत.
Mahtari Vandana Yojana Beneficiary Sunny Leone
हे प्रकरण राज्यातील बस्तर भागातील आहे. येथे महतारी वंदन योजनेचा लाभ सनी लियोन घेत आहे. (पार्न स्टार आणि बॉलीवुडमधील सनी लिओनी नावाची एक चर्चित अभिनेत्री.) सरकारच्या महतारी वंदन योजनेच्या वेबसाइटवर याच नावाने लाभार्थाची नोंद आहे. वेबसाइटवर नोंदणी क्रमांक MVY006535575 प्रविष्ट केल्यावर, लाभार्थ्याचे नाव सनी लिओन असे दिसते, तर तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स (पार्न स्टार) दिसते. योजना सुरु झाल्यापासून, लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा ₹ 1000 रुपये जमा झाले आहेत.
Mahtari Vandana Yojana 10th Installment
खोटी नावे समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेसाध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, छत्तीसगड सरकार महतारी वंदन योजनेत माता-भगिनींच्या नावाने मोठा गोलमाल करत आहे, हे आम्हाला आधीपासूनच वाटत होते. कोन आहे ही सनी लिओन जिच्या कात्यावर पैसे जात आहेत? कोण आहे याचा सूत्रधार या चौकशीचा विषय आहे. तसेच, करीना कपूरच्या नावाने देखील पैसातर जात नाहीय, याचाही तपास सरकारने करायला हवा. महतारी वंदनच्या नावाने मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यामुळेच अशा प्रकारची प्रकरणे समोर येत आहेत.
scheme has been launched in Chhattisgarh to provide financial assistance of Rs 1000 per month to eligible married women of the state
दीपक बैज यांच्या विधानावर भाजपनेही पलटवार केला आहे. भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आहेत. याची चौकशी केली जाईल (All married women above the age of 21 as of 1 st January 2024, including widows, divorced, and deserted women, are eligible to benefit from this scheme).
ही बाब लक्षात येताच प्रशासनाने वेबसाइटवरून ही नोंद हटवली आहे. संबंधित लाभार्थ्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. हे प्रकरण बस्तर ब्लॉकच्या तालूर पंचायतीशी संबंधित आहे. यासंदर्भात बस्तरचे जिल्हाधिकारी हरीश एस म्हणाले, माहिती मिळताच संबंधित बँक खाते होल्ड करण्यात आले आहे. योजनेंतर्गत गेलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच, फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
Women Beneficiaries whose name is in the selected beneficiary list will receive per month financial assistance of Rs. 1,000/- in their bank account as promised by Chhattisgarh Government under Mahtari Vandan Scheme. Application and Payment Status of Mahtari Vandan Scheme will be checked on the Official Website.
Mahtari Vandana Yojana Beneficiary Sunny Leone
Mahtari Vandana Yojana Beneficiary Sunny Leone
Mahtari Vandana Yojana Beneficiary Sunny Leone