बेळगाव—belgavkar—belgaum : तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तुडयेतील (ता. चंदगड) तरुणाचा मृतदेह शनिवारी कावळेवाडी (ता. बेळगाव) शिवारातील एका विहिरीत आढळला. विक्रम नारायण मोहिते (वय 26) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विक्रम 16 सप्टेंबर रोजी दुपारी तुडयेतून बेपत्ता झाला होता. 17 रोजी बिजगर्णीतील मारुती सुरुतकर यांच्या शेतामध्ये त्याचे चप्पल व दुचाकी आढळून आली होती. यानंतर त्याचा नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केला. मात्र, तो सापडला नव्हता. शनिवारी त्याचा मृतदेह कावळेवाडीतील विजय येळळूरकर यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.
याबाबत विजयचे नातेवाईक लुमाना नारायण मोहिते (रा. तुडये) यांनी वडगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी करत आहेत. विक्रम हा उद्यमबाग येथील एका कारखान्यात नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
#Belgaum #Belgavkar #VikramMohite #MissingPerson #CrimeNews #JusticeForVikram #BelgaumNews #Chandgad #Maharashtra #PoliceInvestigation #TragicNews #CommunitySupport #LocalNews #FindTheMissing #FamilySupport #Awareness #SafetyFirst #BelgaumDistrict #VijayYelalurkar #MaharashtraCrime
Belgaum Missing Person Chandgad death
Belgaum Missing Person Chandgad death