बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : राज्यभरात इंदिरा कॅन्टीन सुरु असतानाच बेळगावात आता ‘आक्का कॅफे’ ला सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीच्या कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर कॅफे सुरु करण्यात आले आहे. यासाठी स्वसाहाय्य संघांना संधी देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन व जिल्हा पंचायतीने कौशल्यविकास, उद्यमशिलता आणि राष्ट्रीय जीवनोपयोगी अभियानातंर्गत हा उपक्रम सुरु केला आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (आक्का), ग्रामविकास मंत्री प्रियांका खर्गे व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांच्या हस्ते आक्का कॅफेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. पाटील म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यात 50 आक्का कॅफे सुरु करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याची सुरवात बेळगावमधून करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राज्यभर राबविला जाणार आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर कॅफे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी १५ लाख रुपये साहाय्यधन देण्यात येणार आहे. यातून स्वसाहाय्य संघांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री खर्गे व मंत्री हेब्बाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार राजू सेट, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रोवेशनरी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
आक्का कॅफे ही राज्य सरकारची अभिनव योजना आहे. महिला स्वसाहाय्य संघातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. याठिकाणी १० कर्मचारी नियुक्त केले आहेत. लोकांनी आक्का कॅफेला प्रतिसाद देऊन महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले.
#Belgaum #AkkaCafe #Karnataka #WomenEmpowerment #SelfHelpGroups #SkillDevelopment #Entrepreneurship #LocalInitiatives #CommunitySupport #Inauguration #SocialWelfare #EconomicEmpowerment #WomenInBusiness #CafeCulture #SupportLocal #InnovativePrograms #GovernmentInitiatives #EmpowerWomen #BelgaumDistrict #CulinaryJourney
Belgaum Akka Cafe Karnataka
Belgaum Akka Cafe Karnataka