बेळगाव : सवदींची आमदारकी बरखास्त करा.. आदित्य ठाकरे काय म्हणाले…

Belgaum Belgavkar
3 Min Read

 

बेळगाव—belgavkar—belgaum : मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करणारे कर्नाटकातील (बेळगाव) काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांना बरखास्त करा, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

बेळगावमधील विधानसौधमध्ये सुरू असलेल्या कर्नाटकच्या विधिमंडळ अधिवेशनात अथणीचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी करत असतील तर आपणदेखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे, असे वादग्रस्त विधान केले होते.

- Advertisement -

बेळगाव वाद हा महाराष्ट्र-कर्नाटक संबंधांमधील एक मोठा वादग्रस्त मुद्दा

आदित्य ठाकरे म्हणाले की, काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केल्यास ते सहन केले जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला हवे. त्या आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. जे राज्यातील काँग्रेसच्या आमदारांचे म्हणणं आहे तेच आमचे म्हणणे आहे. रक्त सांडून आम्ही मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे त्यांनी म्हटले. तर बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर करावं की, बेळगाव केंद्रशासित व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

 

मुंबई केंद्रशासित होण्याचा प्रश्नच नाही : विजय वडेट्टीवार

बेळगाव केंद्रशासित व्हावे, अशी आमची मागणी आहे. त्या ठिकाणचे काँग्रेसचे आमदार कर्नाटकमध्ये बोलत असतील तर ती त्या ठिकाणच्या आमदाराची ती भूमिका असेल. राज्यातील काँग्रेस आमदाराची ही भूमिका नाही. कोणी काही बोलले तरी मुंबई केंद्रशासित कधीच होणार नाही. त्यांच्या राज्यासाठी ते भूमिका मांडत असतील, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले.

नेमकं काय म्हणाले होते लक्ष्मण सवदी?

कर्नाटकाचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे. कारण आमचे पूर्व मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे असे आपण म्हणू शकतो. पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि ही बाब लक्षात घेता आमचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे त्यांनी म्हटले.

 

#Belgaum #Mumbai #Karnataka #Congress #AdityaThackeray #PoliticalDebate #Statehood #RegionalPolitics #Maharashtra #BelgaumIssue #PoliticalTensions #Governance #StateRelations #PoliticalStatements #Unity #Leadership #CivicRights #PublicDemand #PoliticalDiscourse #StatehoodDebate

Aaditya Thackeray angry reaction on MLA Laxman Savadi

Aaditya Thackeray angry reaction on MLA Laxman Savadi

 

Aaditya Thackeray angry reaction on MLA Laxman Savadi

Aaditya Thackeray angry reaction on MLA Laxman Savadi
TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *