मार्च २०२४ मध्ये Xiaomi 14 या फोन ने हवा केली होती. Qualcomm Snapdragon 8 gen 3 प्रोसेसर असलेला हा जगातील पहिला फोन होता. तगडा प्रोसेसर, तगडा कॅमेरा असा या flagship फोन ने सर्व कंपन्यांची हवा टाईट केली होती. Xiaomi 14 चे पुढचे मॉडेल म्हणजेच Xiaomi 15 कंपनीने चीनमध्ये लॉंच केला आहे. Xiaomi 15 हाही सध्याचा Snapdragon 8 Elite जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असलेला फोन आहे. Xiaomi 15 भारतात लॉंच होणार आहे याधीच Xiaomi 14 ची किंमत आमझोन वर 20000 ने कमी करण्यात आली आहे.
Xiaomi 14 किती रुपयाला मिळणार
भारतात Xiaomi 14 हा स्मार्टफोन लॉंच झाला तेव्हा त्याची किंमत 69999 ही होती परंतु आता ऑनलाइन म्हणजेच amazon वर हा स्मार्टफोन चक्क 49999 रुपयात मिळत आहे. फोन चे स्पेसीफिकेशन चा विचार करता ही किंमत खूपच कमी आहे. अर्थात कमी किमतीमद्धे एक तगडा स्मार्टफोन मिळत आहे, आणि रु. 45999 ही किंमत कायमस्वरूपी अशीच राहणार आहे.

Xiaomi 14 कॅमेरा कसा आहे
या स्मार्टफोन मध्ये कॅमेरा सेटअप एवढा तगडा आहे की, iphone आणि Samsung चे कॅमेरे फिके पडत आहेत यापुढे. फोटो एकदम भन्नाट निघतात. या स्मार्टफोन मध्ये पाठीमागे तीन कॅमेरा सेटअप आहे आणि पुढील म्हणजेच सेल्फी कॅमेरा ही भारी आहे.
मागील कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरे 50mp +50mp +32mp असे आहेत तसेच या सर्व कॅमेरा ना leica चा सपोर्ट आहे. फ्रंट कॅमेरा हा 32mp चा आहे.
Xiaomi 14 बाकीचे स्पेसीफिकेशन
Xiaomi-14 या स्मार्टफोन मधील डिस्प्ले हा 1.5k amoled 6.36 इंच एवढा आहे. त्याचप्रमाणे hdr10+, Dolby Vision चा सपोर्ट ही आहे. 2670 x1200 , 460 ppi, तसेच रीफ्रेश रेट हा dynamic 1-120hz आहे. या स्मार्टफोन मध्ये britness hbm 1000 nits आणि peak britness हा 3000 nits एवढा आहे. या स्मार्टफोन वजन हे 193 gm एवढे असून 8.20mm thikness आहे. बेटरी 4610 mah दिली असून 90w hypercharge साठी तगडा चार्जर ही देण्यात आला आहे.