तुमच्या कडे असेल होंडा कंपनीची ही कार तर लगेच पाठवा कंपनीकडे नाहीतर…, Honda Recall,

By Admin

Published on:

Honda Recall
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda Recall: या आधीही असे बऱ्याच वेळ झाले आहे की एखाद्या कंपनीच्या काही मॉडेल मध्ये खराबी आली असेल आणि कंपनीने सर्व कार्स ग्राहकांकडून परत बोलवल्या होत्या. होंडा कंपनीच्या बाबतीतही असेच काही झाले आहे. कंपनीच्या लक्षात आल्यावर की आपल्या कार्स च्या फूयल पंप मध्ये मोठी खराबी आली आहे कंपनीने सर्व कार्स परत बोलवल्या (Honda Recall) आहेत.

या मॉडेल्स मध्ये खराबी Honda Recall

Honda Recall :होंडा कंपनीने जून २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या वर्षातील सर्व मॉडेल्स परत बोलावली आहेत. या सर्व कार्स चे फ्यूल पंप कंपनी फ्री मध्ये बदलून देणार आहे. जर तुमची कार वरील सालामधील असेल आणि तुमच्या कार चे मॉडेल खालील पैकी असेल तर तुमच्या ही कारचे फ्यूल पंप कंपनी फ्री मध्ये कंपनीकडून बदलून मिळणार आहे.  

  • होंडा अमेज (Honda Amaze)
  • होंडा ब्रिओ (Honda Brio)
  • होंडा बी-आर वी (Honda BR-V)
  • होंडा सिटी (Honda City)
  • होंडा जेज (Honda Jazz)
  • होंडा डबलू- आर वी (Honda W-RV)

काय आहे कार्स मध्ये खराबी Honda Recall

होंडा कंपनीने दावा केल्यानुसार त्यांच्या जून २०१७ ते ऑक्टोबर २०१८मधील वरील मॉडेल्स मधील फ्यूल पंप मध्ये खराब इंपेलर असू शकतो. यामुळे तुमच्या गाडी चे इंजिन एकतर बंद होऊ शकते नाहीतर गाडी चालू करायला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हा प्रॉब्लेम वारंवार येऊ शकतो. यामुळे कंपनी सर्व कार्स मधी फ्यूल पंप फ्री मध्ये बदलून देणार आहे. तसेच कंपनीने सांगितले आहे की कंपनीच्या साईट वर जाऊन प्रोडक्ट्स अपडेट/ रिकॉल मध्ये जाऊन तुमच्या गाडीचा vin नंबर टाकून चेक करू शकता.

या ठिकाणी क्लिक करून चेक करा

Honda Recall म्हणजे नेमके काय

जास्त करून कार कंपनीमध्ये रिकॉल सिस्टिम असते. जेव्हा कंपनीचे प्रोडक्ट्स विकले जातात आणि अनेक कार्स मध्ये एकाच समस्या येते . त्यावेळेस कंपनी त्यावर संशोधन करते आणि काय खराबी आहे आणि कशामुळे आली आहे हे लक्षात आल्यावर कंपनी त्या सर्व कार्स परत बोलावून तोच एखादा पार्ट फ्री मध्ये बदलून देते. जेणेकरून कंपनीच्या कार्स चा प्रॉब्लेम दूर व्हावा आणि कंपनीचे नाव खराब होऊ नये. याला रिकॉल असे म्हणतात.  

भारतातील रिकॉल ची मोठी उदाहरणे

रिकॉलचा  जवळ जवळ सर्वच कार कंपन्यांना कधीतरी सामान्य करावा लागतो. त्यातीलच ही ५ भारतातील मोठी रिकॉल

  1. मारुती बलेनो आणि वेगन आर (baleno and wagon r)

२०२० मध्ये मारुती कंपनीच्या बलेनो आणि वेगन आर या दोन मॉडेल्स मध्ये सेम म्हणजेच फ्यूल पंप चा प्रॉब्लेम आला होता. कंपनीने १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ ऑक्टोबर २०१९ मधील १३४८८५ युनिट्स परत बोलावून फ्यूल पंप बदलून दिले होते.

  • मारुती ईको (ecco)

४ नोव्हेंबर २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० मधी मारुती कंपनीचे ईको मॉडेल चे ४०४५३ युनिट्स परत बोलावले होते. यामध्ये हेडलाइट चा प्रॉब्लेम झाला होता. कंपनीला सर्व हेडलाइट फ्री  मध्ये बदलून द्याव्या लागल्या होत्या.

  • महिंद्रा थार (Mahindra Tharr)

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची एक फेमस ऑफरोड कार ‘ महिंद्रा थार’ डिझेल याही मॉडेल मध्ये खराबी आली होती. ७ सप्टेंबर २०२० ते २५ डिसेंबर २०२० मधील तयार झालेल्या  सर्व गाड्या कंपनीने परत बोलवल्या होत्या. या गाडीमध्ये काही पार्ट्स खराब बसवण्यात आले होते.

  • महिंद्रा पीकअप (mahindra pickup)

साल २०२१ मध्ये तयार झालेल्या महिंद्रा कंपनीच्या २९८७८ पीकअप युनिट्स कंपनीने परत बोलावले होते. या सर्व युनिट्स मधील फ्यूड पाइप फ्री मध्ये बदलून ग्राहकांना गाड्या परत देण्यात आल्या होत्या.

  • रॉयल एनफील्ड (royal enfield)

रॉयल एनफील्ड कंपनीच्या काही बाईकस कंपनीने परत बोलावून घेतल्या होत्या. कंपनीने शॉर्ट सर्किट ची भीती असल्यामुळे रॉयल एनफील्ड बुलेट ३५०, क्लासिक ३५०, मिटीआर ३५० या मॉडेल्स च्या २३६९६६ युनिट्स परत बोलावले होते. 

आतापर्यंत जगातील सर्वात मोठे रिकॉल

एखाद्या विकलेल्या मॉडेल मध्ये खराबी आल्यास, कंपनीचे नाव खराब होऊ नये यासाठी कंपनीला त्या बॅच मधील सर्व युनिट्स परत बोलावून फ्री मध्ये पार्ट रिप्लेस करून द्यावे लागतात. त्यातीलच जगातील ही पाच मोठी रिकॉल.

कंपनीखराबीसालरिकॉल युनिट्स
फोर्ड (Ford)रिवर्स गियर१९८०२.१ करोड
फोर्ड (Ford)इगनिषण बटन१९९६७९ लाख
फोर्ड (Ford)क्रुज कंट्रोल१९९९१.५ करोड
टोयोटा (Toyota)एकसीलेटर२००९९० लाख
फॉक्सवेगन (volkswagen)सॉफ्टवेअर२०१६८५ लाख
जगातील ही पाच मोठी रिकॉल

Leave a Reply