Salman Khan ला जीवे मारण्याच्या धमक्या काय कमी होताना दिसत नाहीत. १९९८ साली Salman Khan ने राजस्थान मध्ये एका हरिणीची शिकार केली होती त्याची शिक्षा सलमान खान अजून भोगतोय. आठवड्यापूर्वी सलमान खान चा खास फमिली मित्र बाबा सिद्दिकी यांची मुंबई मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येची सर्व जबाबदारी लॉरेन्स ग्यांग ने घेतली आहे. ज्यांनी गोळ्या घातल्या त्यातील तीन जणांना अटक हि केली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार मारायचे होते सलमान खान ला परंतु सलमान खान चा बंदोबस्त खूप तगडा असल्याने सलमान ला मारता आले नाही म्हणून सलमानच्या नजीकच्या व्यक्ती बाबा सिद्दिकीला मारले.
कुणी दिली Salman Khan ला मारण्याची धमकी
सलमान खान ला मारण्याची धमकी हि मुंबई ट्राफिक कंट्रोल रूम ला एका whatsapp मेसेज द्वारे पाठवण्यात आली आहे. पाठविणारा व्यक्ती स्वतःला लॉरेन्स गेंग चा मेंबर सांगत आहे. मेसेज मध्ये लिहिले आहे कि, लॉरेन्स गेंग शी दुष्मनी संपवायची असेल तर सलमान ने पाच करोड रुपये द्यावेत नाहीतर बाबा सिद्दिकी पेक्षा वाईट मरण देऊ आणि या धमकीला हलक्यात घेऊ नको. हा मेसेज पाठविणारा व्यक्ती कोण आहे याचा तपास मुंबई पोलीस करत आहे.
Salman Khan आणि Lawrence Bishnoi ची दुष्मनी
साल १९९८ मध्ये सलमान खान चा हिट चित्रपट ‘हम साथ साथ है’ च्या शुटींग साठी Salman Khan, सैफ आली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, आणि नीलम हे राजस्थान मधील जंगलात शुटींग साठी गेले होते. तेथे सलमान खान ने एका हरिणीची शिकार केली होती. बिष्णोई समाज हरीण ला आपला परिवार मानतात, परिवाराच्या सदस्यासारखे हरणांची काळजी घेतात. त्याच हरणाला सलमान खान ने मारून त्याला शिजवून खाल्ले होते. यासाठी बिष्णोई समाजाने सलमान खान विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. जोधपुर कोर्टाने सलमान खान ला पाच वर्षाचा तुरुंगवास घोषित केला होता. त्यानंतर सलमानला बेल मिळाली. याच कारणामुळे पूर्ण बिष्णोई समाज आणि लॉरेन्स गेंग सलमान खान च्या मागे हाथ धुऊन लागली आहे.
Lawrence Bishnoi Gang ने अनेक वेळा दिल्या सलमान ला धमक्या
Salman Khan ला बिष्णोई गेंग ने याआधी अनेक वेळा धमक्या दिल्या आहेत तसेच सलमान खान च्या घराबाहेर फायरिंग हि केली आहे.
जुन २०२२ पत्राद्वारे धमकी
२०२२ मध्ये सलीम खान मोर्निंग वाक करून घरी आले तेव्हा त्यांना एक पत्र मिळाले. त्यामध्ये बिष्णोई गेंग ने म्हटले होते कि, सलमान ला आम्ही जीवे मारणार आहे आणि त्याची अवस्था मुसेवाला सारखी करणार आहे. या नंतर सलीम खान ने बांद्रा पोलीस स्टेशन मध्ये यासाठी कम्प्लेंट केली होती.
मार्च २०२३ मध्ये मेल द्वारे धमकी
जोधपुर मधील बिष्णोई गेंग चा सदस्य धाकडराम याने सलमान खान च्या मेल वर धमकी दिली होती कि, तू जोधपूरला ये तुझी अवस्था सिद्धू मुसेवाला सारखी करतो.
एप्रिल २०२३ मध्ये मुंबई पोलीस मध्ये फोन
एका १६ वर्षीय युवकाने एप्रिल २०२३ मध्ये मुंबई पोलीस च्या फोन वर फोन करून मी सलमान खान ला ३० तारखेला जीवे मारणार असल्याची धमकी दिली होती. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली तेव्हा त्यानेही बिष्णोई गेंग चा सदस्य असल्याची कबुली दिली.
जानेवारी २०२४ दोन जणांचा फार्म हाउस मध्ये घुसण्याचा प्रयत्न
जानेवारी २०२४ मध्ये सलमान खान च्या फार्म हाउस मध्ये दोघे जण काम्पौंड च्या तर तोडून आत घुसल्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी पकडल्यावर टे सलमान खान चे चाहते आहोत असे सांगितले, परंतु दोघांकडेही नकली ओळखपत्रे मिळाली.
कोण आहे Lawrence Bishnoi
लॉरेन्स बिष्णोई हा ज्या समाजाने सलमान खान विरुद्ध हरणाची शिकार केल्याबद्दल तक्रार केली होती त्याच समाजाचा एक सदस्य आहे. बिष्णोई गेंग चे मुख्य टार्गेट हे सलमान खान ला मारणे हेच आहे. लॉरेन्स गेंग अगोदर फक्त राजस्थान पुरतीच मर्यादित होती. परंतु आता पूर्ण भारतात बिष्णोई गेंग चे जाले पसरले आहे. लॉरेन्स बिष्णोई हा बिष्णोई गेंग चा मोरख्या आहे तो सध्या जेल मध्ये आहे परंतु जेल मधूनच तो आपली पूर्ण गेंग चालवतो. बिष्णोई गेंग ने सिद्धू मुसेवालावर ची हत्या आणि आता बाबा सिद्धिकी ची हत्या या मोठ्या केसेस आहेत.