दिवाळी बोनस -TEAM DETAILING SOLUTIONS कामगारांना मर्सिडीज सारख्या महागड्या कार आणि बाईक

Pratiksha Majgaonkar
5 Min Read
TEAM-DETAILING-SOLUTIONS

Car and Bike Gifted to employees :- ‘TEAM DETAILING SOLUTIONS’ या नावाच्या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना चक्क दिवाळी आधीच कार आणि बाईक भेट (Car and Bike Gifted to employees) म्हणून दिल्या आहेत. स्टील डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ज्या कार भेट स्वरूपात दिल्या आहेत त्यात ह्युंदाई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. कंपनीने हा निर्णय घेतल्या नंतर सर्वच समाज माध्यमांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

TEAM DETAILING SOLUTIONS या कंपनीने त्यांच्या २८ कर्मचाऱ्यांना कार तर २९ कर्मचाऱ्यांना दुचाकी भेट म्हणून दिली आहे असे मनी कंट्रोलच्या रिपोर्ट नुसार समोर आले आहे. या विषयावर बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधरन कन्नन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, “हे कर्मचारीच आमची संपत्ती आहेत. कंपनीच्या यशात या कर्मचाऱ्यांचे मोठं योगदान आहे. या कर्मचाऱ्यांना आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आम्ही त्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.” असे म्हणले आहे.


TEAM DETAILING SOLUTIONS
TEAM DETAILING SOLUTIONS

२०२२ मध्ये देखील भेट स्वरूपात दिली होती कार

यावरच पुढे बोलताना TEAM DETAILING SOLUTIONS कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधरन कन्नन असे म्हणाले की, “आमच्या कंपनीत जवळपास १८० कर्मचारी आहेत. प्रत्येक जण त्यांच्या कामात निपूण आहे. हे सर्व कर्मचारी सर्वसाधारण कुटुंबातील आहे. यापैकी आम्ही अशा काही कर्मचाऱ्यांची निवड करतो, जे त्यांच्या प्रामाणिकपणे आणि समर्पण भावाने काम करतात. आम्ही यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे कार आणि बाईक भेट म्हणून दिली आहे. २०२२ मध्ये आम्ही दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कार भेट दिली होती. त्यानंतर आज आम्ही २८ कर्मचाऱ्यांना कार भेट दिली आहे. यात मर्सिडीज बेन्झसारख्या महागड्या कारचाही समावेश आहे.”

अगदी दुसरे सावजी ढोलकीया

गुजराथ येथे हिऱ्यांचे व्यापारी असणारे सावजी ढोलकीया यांना कोण ओळखत नाही! ते दिवाळी निमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट, महागड्या कार, बाईक असे बोनस म्हणून गिफ्ट करतात अगदी तसेच हे चेन्नई मध्ये असलेल्या TEAM DETAILING SOLUTIONS’ नावाच्या कंपनीच्या उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी दसऱ्याच्या दिवशीच गोड केली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक भेट स्वरूपात दिल्या आहेत.

- Advertisement -

TEAM DETAILING SOLUTIONS कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ९ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. २००५ मध्ये या कंपनीची स्थापना झाली तेव्हा फक्त ४ कर्मचारी इथे काम करत होते. आज या कंपनीच्या दोन साईटवर १८० कर्मचारी काम करतात. कंपनीच्या या यशामागे त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मोठा हात आणि कष्ट आहेत म्हणूनच कंपनीने ही परंपरा सुरू केली.

TEAM DETAILING SOLUTIONS या कंपनीत काम करणारे सर्वच कर्मचारी ग्रामीण भागात राहणारे आहेत. त्यांच्या जीवनशैलीत आणि राहणीमानात अजून सुधारणा व्हावी या हेतूने कंपनीने त्यांना कार आणि बाईक स्वरूपात बोनस दिला आहे.



तब्बल ३.५ कोटी रुपयांच्या कार आणि बाईक

‘TEAM DETAILING SOLUTIONS’ कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट स्वरूपात दिलेल्या या कार आणि बाईकची किंमत तब्बल ३.५ कोटी रुपये इतकी आहे.

बरं या कंपनीने फक्त कर्मचाऱ्यांना हे महागडे गिफ्टच दिलेले नाही तर श्रीधरन कन्नन यांनी सांगितल्यानुसार ते कंपनीतील कर्मचाऱ्यांना लग्नाची भेट म्हणून ५००००/- रुपये भेट स्वरूपात देत असत त्याच्यात आता वाढ करून हा आकडा एक लाख रुपये इतका करण्यात आला आहे.

TEAM DETAILING SOLUTIONS ने अशी दिली भेट

समोर आलेल्या अहवालानुसार, कंपनीने ज्यांना कंपनीत नऊ वर्षांहून अधिक काळ झालेला आहे अश्यांना कार आणि ज्यांना सात वर्षांहून अधिक काळ झालेला आहे अश्यांना दुचाकी भेट स्वरूपात दिल्या आहेत. ही भेट देण्यासाठी श्रीधरन कन्नर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह आपल्या ईस्ट कोस्ट रोडवरील निवासस्थानी बोलावले आणि वाहने भेट म्हणून दिली.

कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

आपल्या कामाची जर कंपनी जाण ठेवत असेल तर कोणत्या कर्मचाऱ्याला आवडणार नाही? याही कंपनीतील कर्मचारी ही भेट पाहून खूपच खुश झाले. कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना श्रीधरन कन्नर म्हणाले की, “हे सर्व त्यांच्यासाठी खूप आश्चर्य देणारे होते. सर्व कर्मचारी आपल्या कामाचे कौतुक झाल्याने खूपच खुश होते.”

या कंपनीच्या गाड्यांचा आहे समावेश

ह्युंदाई, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या सर्वोत्तम ब्रँड्सच्या कार आपल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी दिल्या आहेत.

काही ठिकाणी दिवाळी बोनस अगदी नगण्यासारखा मिळतो तर दुसरीकडे आपल्या कर्मचाऱ्यांची अशी काळजी आणि कामाचे कौतुक करणाऱ्या कंपनी असतात. या महागड्या भेटीची पैश्यात देखील किंमत जास्त असली तरीही आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या कामाचे खरे कौतुक करण्यासाठी कंपनीने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *