बिग बॉस मराठी ५ या शोमध्ये पहिल्यापासून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते तो म्हणजे Suraj Chavan. हा शो काही दिवसातच खूपच लोकप्रिय झाला कारण या शोमध्ये बरेच स्पर्धक हे सोशीयल मीडिया वर फेमस झालेले कलाकार होते. सूरज चव्हाण अत्यंत गरीब परिस्थिति मधून आलेला. त्याने आपल्या विनोदी अभिनय सोशीयल मेडियावर शेयर करून अतिशय लोकप्रिय झाला. Suraj Chavan ला बिग बॉस मराठी ५ चा विजेता होण्यासाठी अनेक कलाकार आणि प्रेक्षकांनी पाठिंबा आणि भरभरून प्रेम दिले. आणि या प्रेमापोटीच सूरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरला आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की Suraj Chavan ला बिग बॉस मराठी ५ विजेता झाल्यावर काय काय मिळेले तर ते पाहुयात.
Suraj Chavan ला मिळाली १४.६ लाख रोख रक्कम
६ ऑक्टो. २०२४ रोजी बिग बॉस मराठी ५ ची फायनल पार पडली, यामध्ये सूरज चव्हाण हा विजेता घोषित करण्यात आला. सूरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरल्यावर ठरल्याप्रमाणे १४.६ लाख रुपयांचे रोख रक्कम मिळाली आहे. त्याचप्रमाणे निक्की तांबोळी ही तिसऱ्या क्रमांकावर, धनंजय पवार हा चौथ्या क्रमांकावर, अंकिता वालवलकर ही पाचव्या क्रमांकावर राहिली. तसेच जान्हवी किल्लेकर हिला रोख स्वरूपात ९ लाख देऊन शोमधून बाहेर काढण्यात आहे. दुसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंतला समाधान मानावे लागले.
बिग बॉस मराठी ५ विजेता ट्रॉफी
बिग बॉस मराठी ५ ची फायनल पार पडली, यामध्ये सूरज चव्हाण हा विजेता घोषित केल्यावर रोख रकमेसह सूरज चव्हाणला एक ट्रॉफी ही मिळाली आहे. ती टॉफी घेऊन सूरज चव्हाण ने प्रथम आपल्या कुलदैवत असलेल्या जेजूरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले. सूरज सोबत दुसऱ्या क्रमांकावर आलेला प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत ही खंडोबाचे दर्शन घेताना दिसला.
एक ईलेक्ट्रिक स्कूटर
बिग बॉस मराठी ५ ची फायनल जिंकल्यावर सूरज चव्हाण ट्रॉफी आणि रोख रकमेसह एक ईलेक्ट्रिक स्कूटर ही बक्षीस स्वरूपात मिळाली आहे. सध्या तरी ही स्कूटर कोणत्या कंपनीची आहे आणि या गाडीची किंमत किती आहे हे जाहित केलेले नाही.
१० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने
बिग बॉस मराठी ५ चा विजेता झाल्यावर सूरज चव्हाणला १० लाख व्हाऊचर स्वरूपात भेटले आहेत. या व्हाऊचरने Suraj Chavan पू. ना. गाडगीळ यांच्या कोणत्याही शाखेतून कधीही १० लाख रुपयांचे सोने खरेदी करू शकेल.
चित्रपटात ही मिळाले काम
बिग बॉस मराठी ५ येण्या अगोदर सोशीयल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या सूरज चव्हाण ला २०२३ साली मुसंडी हा चित्रपट मिळाला होता आणि आता त्याला अजून राजा राणी एक चित्रपटात काम मिळाले आहे. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी Suraj Chavan ला एका चित्रपटाची ऑफर ही दिली आहे. बिग बॉस मराठी ५ च्या प्रसिद्धी नंतर यापुढे ही सूरजला चांगल्या मालिका आणि चित्रपटात काम मिळेल.
सूरज चे त्याच्या गावी जंगी स्वागत
सूरज चव्हाण ने बिग बॉस मराठी ५ चे प्रथम पारितोषिक जिंकल्यावर गावकऱ्यांनी त्याचे गावामध्ये मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. सूरज चव्हाण चे मूळ गांव मोढवे, तालुका -बारामती, जिल्हा -पुणे हे आहे. जिंकलेली ट्रॉफी घेऊन सूरज चे गावातून मिरवणूक काढली आणि सूरज ने ही सर्व गावकऱ्यांचे आभार मानले.
FAQ
Which is the village of Suraj Chavan?
Suraj Chavan’s village is Modwe, Taluka- Baramati, Dist – Pune
How much money did Suraj Chavan get from Bigg Boss?
Cash to Suraj Chavan from Bigg Boss 14. 6 lakh and 10 lakh gold ornaments have been received
Will there be a Suraj Chavan film next year?
Yes famous director Kedar Shinde has offered Suraj Chavan a movie Aahar and this movie will be released in 2025.
What is Suraj Chavan’s Kuladivata?
Jejuri Khandoba