सणासुदीचे दिवस म्हणजे खरेदीचे दिवस. आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून या दिवसात लोकं अगदी मोबाईल पासून ते car पर्यंत अनेक वस्तू खरेदी करत असतात आणि ही गोष्ट ओळखूनच या महिन्यात कार कंपन्या नवीन कार लॉन्च करत आहेत. कंपन्या त्यांच्या SUV आणि car लॉन्च करणार आहेत तर कोणत्या आहेत त्या कंपन्या? आणि कोणत्या आहेत त्या car ?ते आपण पाहू
New gen Mercedes-Benz E-Class car
मर्सिडीज-बेंझसाठी भारतात सर्वात महत्त्वाच्या मॉडेल्स पैकी एक म्हणजे ई-क्लास आहे, आणि ही लक्झरी सेडान 9 ऑक्टोबर 2024 रोजी भारतात लॉन्च होणार आहे. ही कार E200 आणि E220d या मॉडेल्समध्ये सादर केली जाणार आहे. या करमध्ये 2.0लिटर टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह सौम्य हायब्रीड प्रणाली असणार आहे.
Mercedes-Benz आपली लक्झरी सेडान E-Class चं फेसलिफ्ट व्हेरिअंट भारतात लाँच करणार आहे. ही नवी कार सध्याच्या कारच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी असणार आहे.
या कारमध्ये फ्रन्टला नवी ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय यासोबत फ्रन्ट बम्पर आणि अलॉय व्हिल्सही देण्यात आले आहेत. E-Class मध्ये 2 लिटरचे चाक सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. ते 194bhp पॉवर आमि 320nm चा टॉर्क जनरेट करते. तसंच कंपनीनं ही कार दोन डिझेल व्हेरिअंटमध्ये लाँच केली आगे. ही कार पाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
किती असेल या मर्सिडीजची किंमत?
ही कार पाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे त्याप्रमाणे कारच्या किंमती खालील प्रमाणे आहे.
E200 Expression व्हेरिअंटची किंमत 63.6 लाख रूपये
E200 Exclusive ची किंमत 67.2 लाख रूपये
E220d Expression ची किंमत 64.8 लाख रूपये
E220d Exclusive ची किंमत 68.3 लाख रूपये
सर्वात महागड्या E350d व्हेरिएंटच्या कारची किंमत 80.9 लाख रूपये
या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत. कारचं डिझाईन आणि लूकमध्येही काही बदल पाहायला मिळत आहे. कारचा फ्रन्ट लूक हा यापूर्वीच्या तुलनेत अधिक स्पोर्टी आहे. यासोबतच कारचा रिअर लूकही अधिक आकर्षक करण्यात आला आहे. कारमध्ये स्पोर्टिअर एक्सटिरिअर डिझाईन आणि अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहे. तसंच यात नवे ऑडाप्टिव्ह एलईडी हेडलँप्स आणि एलईडी टेललँप्स देण्यात आले आहेत. E200 आणि E220 D ही कार तब्बल 7.6 सेकंदात 100 किमी प्रति तास तर 350D ही कार 6.1 सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे.
New-gen Kia Carnival Car
ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च होणाऱ्या या कारची डिझान पुर्णतः नवीन असणार आहे. या कारमध्ये मागील बाजूस सिग्नेचर स्लाईडिंग दरवाजे असतील तर या कारमध्ये सात सीट्सचा लेआऊट मिळेल. या कारचे प्रमुख आकर्षण आणि वैशिष्ट्य म्हणजे दोन इलेक्ट्रॉनिक सनरुप असणार आहे. लेव्हल 2 ADAS सूट, आठ एअर बॅग्स, ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड टेलगेट, HUD, वायरलेस चार्जर आणि इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल दुसऱ्या रो सीट्सचा समावेश असणार आहे. ही कार 3 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होणार आहे.
किती असेल Kia Carnival ची किंमत
Kai कार्निवल MPV ग्लेशियर व्हाईट पर्ल आणि फ्युजन ब्लॅक या दोन कलर्समध्ये लॉन्च होणार आहे. या कारची खरी किंमत लॉन्चच्या वेळीच आपल्याला कळेल तरी देखील अंदाजे 50 लाख किमती मध्ये ही कार लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
All-new Kia EV9 Car
भारतात जास्त मागणी इलेक्ट्रीक कार्सना आहे. आणि भविष्यात ती वाढत जाणार आहे. या सगळ्याचा विचार करू किया कंपनी एक नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च करत आहे. या कारमध्ये ग्रिलमधील इंटिग्रेटेड डिजिटल पॅटर्न लाईट्स, स्टार मॅप लायटिंग नावाचे एलईडी डीआरएल यांसारखे फीचर्स आहेत. हेडलाईट सेटअप सारखे कंपोनंट देखील आहेत जे एनिमेटेड लायटिंग पॅटर्न तयार करतात. या कारमध्ये काळ्या रंगात मिनिमलिस्ट डॅशबोर्ड दिसून येऊ शकतो. ड्युअल टोन व्हाईट आणि ब्लॅक लेदरेट सीट अपहोल्स्ट्री देखील असू शकते. त्याच वेळी, यात ट्रिपल स्क्रीन सेटअप देखील असण्याची शक्यता आहे., त्यापैकी दोन 12.3-इंच स्क्रीन आणि दरम्यान 5.3-इंचाचा क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.. याशिवाय, Kia EV9 स्टार्ट/स्टॉप, क्लायमेट कंट्रोल आणि वेंटिलेशन सिस्टम, मीडिया, 8-वे पॉवर ॲडजस्टमेंट आणि मसाज फंक्शनसह कॅप्टन सीट असण्याची शक्यता आहे. या नवीन कारमध्ये 99.8kWh क्षमतेची बॅटरी पॅक उपलब्ध असेल. यात दोन इलेक्ट्रीक मोटर्स 384 PS पॉवर आणि 700 Nm टॉर्क जनरेटर करतील. असे म्हणत आहेत की ही कार 500किमी पर्यंतच्या रेंजमध्ये येणार आहे. या कारची बॅटरी फक्त 24 मिनिटांत 10 ते 80℅चार्ज होईल.
कारची किंमत
या कारची किंमत 80 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे
तुम्ही जर लग्जरी कार घेण्याच्या विचारात असाल तर या कार्सचा नक्की विचार करू शकता.