BYD eMax 7 होणार भारतात लाँच; एकाच चार्जमध्ये मिळणार खतरनाक रेंज

By Pratiksha Majgaonkar

Updated on:

BYD-eMax-7
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BYD eMax 7 MPV:- भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय कार ब्रँड BYD म्हणजेच Build Your Dream येत्या ऑक्टोबर महिन्यात आपली खास कार लाँच करणार आहे. ही गाडी भारतात 8 ऑक्टोबरला लाँच होणार असून कंपनीने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. हीच गाडी परदेशात M 6 या नावाने विकली जाते.

भारतीय बाजारपेठेत मात्र या गाडीला eMax 7 असे नाव देण्यात आले आहे. या गाडीच्या नावातून तिचे upgrade करण्यात आले आहे हे समजून येते. यातील मॅक्स म्हणजे सर्व बाबतीत ठरलेली उत्तम कामगिरी आणि 7 म्हणजे आधीच्या म्हणजेच 6 व्या जनरेशन कडून 7 व्या जनरेशनकडे या गाडीने केलेला प्रवास दिसून येत आहे.


BYD eMax 7 interiel

BYD कंपनी आता भारतीय बाजारपेठेत आपले स्थान घट्ट करत असताना सणांच्या वेळी ही फॅमिली कार कंपनीने लाँच करण्याचे ठरवले आहे. दसरा आणि नंतर दिवाळी हे मोठे सण येत असताना कंपनीने ही गाडी 8 ऑक्टोबरला विक्रीस ठेवण्यात येणार असल्याचे म्हणले आहे. त्यात सध्या electric गाड्यांची क्रेझ आणि वाढती मागणी पाहता याही गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

byd emax 7 specifications and features

या नव्या BYD eMax 7 MPV गाडीत नवे LED हेडलाईट आणि DRL, फ्रेश फ्रंट, सॅटीन फिनिशि असलेले नवे ग्रील, rear बंपर आणि अगदी नवे कोरे alloy wheels देण्यात आले आहेत.

BYD eMax 7 यात 6 आणि 7- सीट्स अश्या दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये येणे अपेक्षित आहे. यात निश्चित पॅनोरॅमिक काचेचे छप्पर, लेदरेट अपहोल्स्ट्री, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड मटेरियल, फॉक्स लाकूड आणि ॲल्युमिनियम ॲक्सेंटसह पुन्हा नव्याने डिझाइन केलेले सेंटर कन्सोल आणि ADAS सूट मिळण्याची शक्यता आहे. यात BYD चा लोगो असणारी 12.8 इंच फिरणारी इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळू शकते.

byd emax 7 interior

BYD M6 सारखी केबिन असलेली ही गाडी भारतीय बाजारात 6 सीटर लेआऊटची असेल. यात ड्युअल-टोन केबिन थीम, नवीन ड्राइव्ह मोड, 12.8 इंचाची फिरणारी टच स्क्रीन, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि हवेशीर फ्रंट सीट्स आहेत.

यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सहा एअर बॅग्स, एक 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या कार मध्ये लेव्हल-2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम (ADAS), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग असे लेटेस्ट फीचर्स देखील आहेत.


BYD eMax 7 interial

byd emax 7 range

ही गाडी इलेक्ट्रिक version मध्ये असेल आणि एका चार्ज मध्ये खूप चांगली रेंज देणार आहे. BYD eMax 7 हे इलेक्ट्रिक मॉडेल 530 किमी इतकी हाय रेंज देणार आहे.

BYD eMax 7 MPV battery

जागतिक स्तरावर eMax 7 दोन बॅटरी पर्याय देते. यात पहिला पर्याय म्हणजे 55.4kWh ची बॅटरी ज्यात 420km ची रेंज मिळते आणि 71.8kWh ची बॅटरी ज्यात 530km ची रेंज मिळते असे दोन पर्याय आहेत.

भारतीय आवृत्तीमध्ये 71.8kWh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे जी 204bhp आणि 310Nm टॉर्क जनरेट करते.

BYD eMax 7 MPV Price

BYD e6 च्या तुलनेत कदाचित eMax 7 कदाचित प्रीमियम असेल. E6 ची किंमत 29.15 लाख रुपये होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी BYD मिडसाईज इलेक्ट्रिक SUV म्हणजे BYD इंडिया मधील EPV (इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेइकल्स) व्यवसायाचे प्रमुख राजीव चौहान म्हणाले की, आगामी BYD इलेक्ट्रिक SUV ची एक्स शोरुम किंमत सुमारे 20 लाख रुपये असेल.

आगामी BYD मध्यम आकाराची इलेक्ट्रिक SUV 2025 च्या उत्तरार्धात भारतीय रस्त्यांवर येण्याची अपेक्षा आहे. शिवाय, चौहान यांनी खुलासा केला की BYD पुढील दोन वर्षात भारतात प्लग-इन हायब्रिड वाहने सादर करण्याची योजना आखत आहे.


FAQ

  1. When will BYD eMax 7 MPV launch in India?

    8th October 2024

  2. What was the price of BYD eMax 7 MPV Price in India?

    Expected Price (ex showroom) Rs. 29.15 Lakhs

Leave a Reply